Learn For Dreams
“भारत कोविड-19 आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी” 15,000 कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविड-19 महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी.
भारताच्या आकस्मिक प्रतिसाद आणि आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेसाठी आवश्यक असलेल्या 15,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली.
ठळक बाबी
हा निधी तीन टप्प्यांत वापरला जाणार आहे. कोविड-19 रोगाचा सामना करण्यात तातडीच्या उपायांसाठी 7,774 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उर्वरित निधी येत्या चार वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वापरला जाणार आहे.
केली जाणारी सर्व कार्ये आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत केली जाणार आहेत.
कोविड-19 रोगाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आकस्मिक प्रतिसादाची व्यवस्था असून त्याच्या अंतर्गत निदान आणि कोविड-19 समर्पित रुग्णालये व उपचार सुविधा, संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती औषधे आणि उपकरणे यांची व्यवस्था तसेच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ करीत भविष्यात या आजाराचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेत रुग्णालये आणि इतर व्यवस्था सज्ज ठेवणे, निरीक्षण कामांसाठी प्रयोगशाळा आणि इतर व्यवस्था तयार करणे
जागतिक संसर्गजन्य आजारविषयक संशोधन आणि समुदायांचा सहभाग, संपर्कातून असणाऱ्या धोक्यांविषयी सातत्याने माहिती देणे अशी कामे केली जाणार आहेत.
या निधीपैकी मोठा हिस्सा आकस्मिक आरोग्य संकटांच्या सज्जतेसाठी खर्च केला जाणार आहे.
त्याशिवाय, अशा जागतिक संसर्गजन्य आजारांचा सामना करण्यासाठी संशोधन व बहु-विभागीय राष्ट्रीय संस्थांच्या मदतीने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट केली जाणार. यात समुदायांचा सहभाग वाढवणे, आजाराच्या धोक्याविषयी माहिती देणे आणि त्यापासून बचावासाठी उपाययोजना, क्षमता बांधणी, देखरेख इत्यादी कामे केली जाणार.
कोविड-19 च्या आजारावर उपचार करण्यासाठी समर्पित रुग्णालये, कोविड हेल्थ सेंटर,
कोविड केअर सेंटर यांची उभारणी करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 3,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला जात आहे.
विलगीकरण, तपासण्या, उपचार, आजाराचे संक्रमण रोखणे, संक्रमित भाग बंद करणे,.
सामाजिक नियमांचे पालन आणि निरीक्षण यासाठीची सविस्तर मार्गदर्शक तत्वे, शिष्टाचार आणि नियमावली प्रसिद्ध करणे,
अधिक संक्रमित भाग ओळखून तिथे प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जात आहे.
निदान करण्यासाठीच्या प्रयोगशाळांची क्षमता आणि संख्या वाढवण्यात आली
असून दैनिक क्षमता वाढविण्यात येत आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या अंतर्गत सध्या असलेल्या बहु-रोग चाचणी व्यवस्थेचा लाभ घेत
13 लक्ष कोविड-19 टेस्ट किटची मागणी देण्यात आली आहे.
सामुदायिक आरोग्य स्वयंसेवकांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण निधीच्या अंतर्गत विमासंरक्षण देण्यात आले आहे.
त्याशिवाय, PPE सूट, N-95 मास्क, व्हेंटीलेटर, टेस्ट किट आणि औषधे यांचा पुरवठा केंद्राकडून सातत्याने होत आहे.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now