Learn For Dreams
Hindi Physics Practice Question Set 6 उष्णतेची एकके
CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात.
MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात.
CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात.
एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात.
1 कॅलरी = 4.18 ज्यूल.
विशिष्ट उष्माधारकता ‘C’ या चिन्हाने दर्शवितात.
विशिष्ट उष्माधारकतेचे MKS पद्धतीत एकक Kcal/kg0C हे आहे.
CGS पद्धतीत त्याचे एकक Cal/g0 हे आहे.
एक ग्रॅम वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थातील वाढणारे तापमान समान नसते.
एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 10C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची ‘विशिष्ट उष्माधारकता’ होय.
काही पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकता पुढीलप्रमाणे आहेत.
अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो. परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.
खिळ्याच्या डोक्यावर हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते. अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.
बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो. म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.
यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.
लाकडी चौकटीमध्ये स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते. पेचकस स्क्रुला लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now