Learn For Dreams
Health department exam TET on the same day : दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना फटका
आरोग्य विभागाची गडची परीक्षा 31 ऑक्टोबर ला घेण्यात येणार आहे मात्र त्याच दिवशी राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना फटका बसणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा 10 ऑक्टोबरला होणार होती. मात्र त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्याने परीक्षा परिषदेने टीईटी 31 ऑक्टोबर ला घेण्याचे जाहीर केले आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबरला होणार होत्या. मात्र त्यातील तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आता आरोग्य विभागाची गट-क ची परीक्षा 24 ऑक्टोबर आणि गडची परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांसाठी नोंदणी केलेले उमेदवार आता अडचणीत सापडले आहेत पिटी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा परीक्षा परिषदेने केली होती त्यामुळे आरोग्य विभागाने परीक्षेसाठी 31 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करताना त्या दिवशी दुसरी कोणती परीक्षा आहे की नाही याची तपासणी का केली नाही? परीक्षांच्या आयोजनाची प्रक्रिया योग्य पद्धतीने नियोजन करून का केली जात नाही उमेदवारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
एकाच दिवशी दोन परीक्षा आल्याने कोणती परीक्षा पुढे ढकलली जाणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.