Learn For Dreams
गुरुत्वबल (Gravitational Force) :सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.
सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.
न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ असे म्हणतात.
हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.
F=G m1 m2 /r2 G = विश्वगुरुत्व स्थिरांक
SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2
· CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2
एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच ‘गुरुत्व त्वरण’ असे म्हणतात.
पिसा येथील झुलत्या मनोर्यातवरून एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तूमानाचे दगड गॅलिलियोने खाली सोडले व असा निष्कर्ष काढला की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानवर अवलंबून नसते.
गुरुत्वत्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर व वस्तूच्या उंचीवर अवलंबून आहे, पण वस्तूच्या व्स्तुमानावर नाही.
गुरुत्व त्वरण g = 9.8 m/s2 (सरासरी)
पृथ्वीच्या त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे. तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे.
g चे मूल्य ध्रुवावर_ 9.83m/s2 आहे.
g चे मूल्य विषुववृत्तावर_ 9.78m/s2 आहे.
वस्तुमान (Mass)-
कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्यसंचय होय. वस्तुमान हो अदिश राशि असून SI एकक kg आहे.
वस्तुमान सगळीकडे सारखेच आहे. ते कधीही बदलत नाही. वस्तुमान कधीही शून्य होत नाही.
जितके वस्तुमान जास्त, तितके जडत्वही जास्त असते. दुकानामधील तराजू फक्त वस्तुमानांची तुलना करू शकतो.
वजन (Weight-)
एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.
वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय.
वजन ही सदिश राशी आहे. (w=mg)
g ची किंमत सगळीकडे सारखी नाही. त्यामुळे वजनसुद्धा सगळीकडे सारखे नाही.
वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी राहील.
गुरुत्व बलाच्या प्रभावापासून मुक्त अवकाशयानात अंतराळवीरांना वजनरहित अवस्थेचा प्रत्यय येतो. तो वजनदार वस्तु सहज उचलू शकतो. कारण तेथे प्रत्येक वस्तूचे वजन w शून्य असते.
मुक्तपतन-
झाडाचे वाळलेले पान, पिकलेले फळ हे केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात. त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतो.
मुक्तपतनाच्या वेळी हवा या वस्तूला विरोध करते. कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते. खर्यात अर्थाने मुक्त पतन हे फक्त निर्वातातच शक्य आहे.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now