आरोग्य विभाग परीक्षा रद्द झाल्याने नुकसानभरपाई देणार?

Compensation for cancellation of exam? : परीक्षा रद्द झाल्याने नुकसानभरपाई देणार?

असे काय घडले की परीक्षा रद्द केल्या?

  • विशेष म्हणजे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 24 सप्टेंबरला सकाळी समाज माध्यमांवर ऑनलाईन येऊन आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबत घोषणा केली होती की अफवांवर विश्वास ठेवू नये.
  • परीक्षा या आहेत त्याच वेळेत होतील पण अगदी त्याच दिवशी संध्याकाळी असे काय घडले की एकाएक परीक्षा रद्द केल्या असा प्रश्न एमपीएससी समन्वय समितीने उपस्थित केला आहे.

Compensation for cancellation of exam?

आरोग्य विभागाच्या आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निर्णयांचा आर्थिक फटका गरीब उमेदवारांना बसला आहे त्यामुळे पुरुष उमेदवारांना प्रत्येकी पाच हजार रुपये व महिला उमेदवारांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करून देईल ते पैसे उमेदवार यांच्या खात्यात वर्ग करावेत अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीचा महेश घर पुढे राहुल कवठेकर निलेश गायकवाड विश्वंभर भोपळे यांनी केली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागात 6500 पेक्षा जास्त गट क व गट ड पदांसाठी 25 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी परीक्षा आयोजित केली होती आरोग्य विभागाने 24 सप्टेंबर 2021 रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान एक पत्रक प्रसिद्ध करत भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचे जाहीर केले परीक्षेला अवघे दहा-बारा तास शिल्लक असताना परीक्षा रद्द करण्याची तुघलकी निर्णय जाहीर केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विदर्भ मराठवाडा पश्‍चिम महाराष्ट्राचा खेड्यापाड्यातील तरी विद्यार्थ्यांनी पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक या मोठ्या शहरात भरतीच्या जागा जास्त असल्यामुळे फॉर्म भरले होते ज्यांना प्रवेशपत्र मिळाले होते ते एक दोन दिवस आधीपासूनच मिळेल त्या वाहनाने परीक्षा देण्यासाठी या शहरांमध्ये निघून गेले होते आपण परीक्षा स्थगितीचा निर्णय किमान आठ दिवस आधी घ्यायचे अपेक्षित असताना वेळेवर परीक्षा रद्द केली.

Compensation for cancellation of exam?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *