शरीर अवयव कान माहिती Body Organs Ear Information
कान
बाह्यकर्ण
मध्यकर्ण
अंतर्कर्ण
गोणिका व लघुकोश
कानाचे विकार
बाह्यकर्ण विकार
केसतूड
बाह्यकर्णशोथ
मध्यकर्ण विकार
चिरकारी मध्यकर्णशोथ
कर्णपश्चास्थिशोथ
अंत्रकर्ण विकार
बहिरेपणा
उपचार
मासे
उभयचर
सरीसृप
पक्षी
सस्तन प्राणी
श्रवणाच्या इंद्रियाला कान असे म्हणतात. शरीराचा समतोल राखणे हेही अंतर्कर्णाचे कार्य आहे.
याचे बाह्य, मध्य व अंतर्कर्ण असे तीन भाग सस्तन प्राण्यांत स्पष्ट दिसतात. सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर (जमिनीवर व पाण्यात वावरणारे) व पक्षी यांत मध्य व अंतर्कर्ण असे दोनच भाग दिसतात.
तर जलचरांत फक्त अंतर्कर्णच अस्तित्वात असतो. या लेखात प्रथमत: मानवी कानासंबंधी व त्यानंतर अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या आणि मनुष्येतर पृष्ठवंशी प्राण्यांच्या कानांसंबंधी माहिती दिली आहे.
हवेतून आलेल्या ध्वनिलहरी एकत्रित करून बाह्यकर्ण कर्णपटलावर (कानाच्या पडद्यावर) पोहोचवितो. कर्णपटलाचे हे कंपन मध्यकर्णातील अस्थींच्या साखळीने व थोडेफार हवेतून अंतर्कर्णात पोहोचते.
सर्पिल कुहरात (अंतर्कर्णातील हाडांनी बनलेल्या नलिकाकार पोकळीत) व श्रोतृ कुहरात (सर्पिल कुहराच्या मध्य भागातील लंबवर्तुळाकार पोकळीत) काही जागी संवेदन ग्राहके (संवेदना ग्रहण करणारी मज्जातंतूची टोके ) असतात.
त्यांच्यामार्फत अंगस्थिती (तोल सांभाळण्याच्या दृष्टीने असणारी शरीराची अवस्था) व ध्वनिलहरींमुळे झालेला द्रवदाबातील फरक आपण ओळखू शकतो [→ संस्थिती रक्षण]. पृष्ठवंशी प्राण्यांत समतोलपणाचे ज्ञान श्रवणज्ञानापेक्षा पुरातन आहे.
श्रवणाकरिता वापरला जाणारा अंतर्कर्णाचा भाग सस्तन प्राण्यांत जास्त स्पष्ट वाढलेला दिसतो.
♦️कर्णपाली (कानाची पाळी) व बाह्यकर्णमार्ग मिळून बाह्यकर्ण बनतो. बाह्यकर्णमार्गाच्या आतल्या टोकाला कर्णपटल असते.
♦️कर्णपाली उपास्थीची (मजबूत व लवचिक पेशीसमूहाची कूर्चेची) बनलेली असून तिच्यावर त्वचेचे आवरण असते. कर्णमार्गाचा बाहेरचा भाग उपास्थीचा व आतील अस्थीचा असतो.
♦️त्यावर बहुस्तरीय पट्टकीय (एकावर एक थर असलेल्या घट्ट चपट्या) स्तरांचे आवरण अगदी ताणून बसलेले असते. यामुळे त्यावर बारीकसा फोड झाला तरी सुद्धा फार वेदना होतात.
♦️या अधिस्तरांत (चपट्या कोशिकांच्या दृढ स्तरांत) लोम (केस) व सूक्ष्म ग्रंथी असतात. त्या ग्रंथी चिकट लालसर स्त्राव निर्माण करतात. घट्ट झालेल्या स्त्रावास कानातील मळ म्हणतात.
♦️मार्गाची लांबी सु. २४ मिमी. असून तो नागमोडी असतो.
कर्णदर्शिकेतून (कानाच्या आतील भागाच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या नळीतून) बाह्यकर्णमार्गात पाहिल्यास मोतिया रंगाचे कर्णपटल दिसते.
♦️ते हाडाच्या खोबणीमध्ये ताणून व तिरकस बसलेले असते. याचा वरील भाग कमी ताणलेला असतो. कर्णपटल कोलॅजन (एक प्रकारच्या प्रथिनाच्या) तंतूंचे बनलेले असून त्याच्या बाह्यांगावर पट्टकीय अधिस्तर व आतल्या अंगास श्लेष्मकलेचा (बुळबुळीत अस्तराचा) स्तर असतो. याचे क्षेत्रफळ ५५ चौ. मिमी. असते.
♦️ ध्वनिलहरीने हा कंप पावतो आणि आतील बाजूस पडद्याला टेकलेल्या अस्थिकांच्या (लहान हाडांच्या) साखळीत कंप निर्माण करतो.
♦️मध्य कर्णातील पुष्कळसे विकार या पटलाच्या तपासणीने समजतात.
💥कर्णपटलाच्या आतील बाजूस व अंतर्कर्णाच्या बाहेर शंखास्थीच्या (कवटीच्या बाजूच्या दोन्हींकडील कमानीसारख्या भागातील हाडाच्या) लहानशा पण पोकळ वेड्यावाकड्या भागास मध्यकर्ण म्हणतात.
💥मध्यकर्णाची रचना समजण्यासाठी प्रथम तो निर्माण का झाला हे पाहणे आवश्यक आहे. सरीसृप, पक्षी व सस्तन प्राण्यांत तो आढळतो, पण जलचर प्राण्यांत आढळत नाही.
💥अंतर्कर्णात संवेदन ग्राहक द्रव माध्यमात असतात. ध्वनिलहरीने द्रव माध्यमात तरंग उत्पन्न झाल्यासच ते ग्राहक चेतवले जातात व ऐकू येते.
💥ध्वनिलहरी उत्पन्न करण्यास द्रवामध्ये हवेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च करावी लागते कारण द्रवाची घनता हवेपेक्षा जास्त आहे
💥. जलचर प्राण्यात पाण्यातून असलेल्या तरंगाच्या उर्जेमुळे अंतर्कर्णातील द्रव सहज कंप पावू शकतो; पण भूचर प्राण्यांत ध्वनिलहरी हवेतून येतात व त्यांना द्रवात कंप निर्माण करावयाचा असतो. त्यामुळे ते तरंग अंतर्कर्णापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यातील उर्जेचा साठी वाढविला पाहिजे.
💥 तो मध्यकर्णातील अस्थिकांमार्फत होतो म्हणून मध्यकर्णाची आवश्यकता आहे. त्यात बिघाड होताच कमी ऐकू येते.
🌸शंखास्थीच्या घन विभागात अंतर्कर्ण असतो. त्याची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. त्याचे प्रमुख दोन भाग आहेत
🌸(१) अस्थिमय सर्पिल कुहर व (२) कलामय (पातळ पटलाचे बनलेले) सर्पिल कुहर.
कलामय सर्पिल कुहराभोवती अस्थिमय सर्पिल कुहराचे आवरण असते. या दोन्ही कुहरांच्यामध्ये असणाऱ्या द्रवाला परिलसीका आणि कलामय कुहरात असलेल्या द्रवाला अंतर्लसीका म्हणतात.
🌸 अस्थिमय कुहराच्या आतील भागावर पर्यास्थी कलेचे (एक प्रकारच्या संयोजी ऊतकाचे म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशीसमुहाचे) आवरण असते. तेथून बारीक तंतू निघून ते कलामय कुहराला जखडून ठेवतात.
🌸अस्थिमय कुहराला असलेल्या चाळणी- सारख्या छिद्रांतून मेंदूपासून निघणाऱ्या आठव्या तंत्रिकेचे दोन भाग आत येतात.
🌸अस्थिमय सर्पिल कुहराचे तीन भाग आहेत. (१) श्रोतृ कुहर, (२) कर्णशंकू (किंवा कर्णशंबूक, अस्थिमय कुहरातील शंक्वाकार नाल) आणि (३) अर्धवर्तुलाकृती नलिका.
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
🍃एका रेषेत होणारे गतिवर्धन व डोक्याची पुढे, मागे किंवा बाजूस झालेली हालचाल गोणिका व लघुकोश यांतील संवेदन ग्राहकांमार्फत समजते.
🍃येथील संवेदन ग्राहक श्रवण तंत्रिका शाखेच्या टोकाशी असतो. या ग्राहकाची मूळ रचना इतर अंतर्कर्ण ग्राहकासारखीच असते.
🍃 येथे जिलेटीनसदृश पदार्थात रेतीसारखे बारीक स्फटिकरूपी कण असतात.त्यांना
कर्णवालुका म्हणतात. त्यामुळेच या संवेदन ग्राहकांस कर्णवालुकाग्राहक असे नाव आहे. जसजशी प्राण्यांच्या डोक्याची स्थिती किंवा वेग बदलतो तसतशा कर्णवालुका गुरूत्वाकर्षणाने ओढल्या जातात, लोमावरील ताण कमीजास्त होतो व हा ताणातील फरक ज्ञात होतो आणि त्यावरून डोक्याची स्थिती समजते. यामुळे येथील संवेदन ग्राहकास गुरूत्वाकर्षण संवेदन ग्राहक म्हणतात.
कर्णशंकू (कर्णशंबूक) : हा भाग श्रावणाशी संबंधित आहे. हा पावणे तीन वेटोळ्यांचा असतो.
🍃अस्थिमय शंकूंच्या वेटोळ्यात कलामय शंकूची वेटोळी असतात. शंकूच्या मधल्या शंक्वाकार कण्यास मध्यनाभी म्हणतात. मध्यनाभीपासून निघणारे नाजूक सर्पिल पत्र (पातळशी पट्टी) सर्व वेटोळ्यांतून जाते.
🍃हे पत्र अर्धवट रूंदीचे असून ते शंकुभित्तीपर्यंत पोहोचत नाही. हे मधले अंतर आधारकलेने जाडलेले असते. आधार कला तळाच्या वेटोळ्यांत कमी रूंदीची असते व जसजशी ती शंकूच्या टोकाकडे येते तसतशी ती जास्त रूंद होते. अशा प्रकारे शंकूच्या वेटोळ्याचे दोन भाग पडतात. वरच्या भागाचे `राइसनर’ कलेने (राइसनर नावाच्या शास्त्रज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या कलेने) परत दोन भाग होतात. अशा प्रकारे वेटोळ्यात तीन भाग पडतात.
🍃 वरच्या भागास प्रकोष्ठ सोपान, मधल्यास मध्य सोपान व खालच्या भागास कर्णपटल सोपान म्हणतात. पहिला व तिसरा भाग शंकूच्या टोकात असलेल्या बारीक सर्पिल छिद्राने एकमेकांस मिळतात.
🍃याला संधी सोपान म्हणतात. या दोन सोपानांत परिलसीका असते, तर मध्य सोपानात अंर्तलसीका असते
⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
dB) हे आवाजाची पातळी मोजण्याचे एक एकक आहे. ही पातळी ज्या ठिकाणी आवाज निर्माण होतो त्या ठिकाणी मोजली जाते.
तेथून जसजसे दूर जाऊ तसतशी डेसिबेलची मात्रा कमीकमी होत जाते. हे लॉगरिथमिक स्केल असल्याने dBचे माप १०ने वाढले तर आवाजाची तीव्रता शंभरपट होते.
शून्य dB म्हणजे ऐकू येणारा सर्वात हळू आवाज. त्याच्या दहापट मोठ्या आवाजाची मात्रा १० dB. २० dB आवाज म्हणजे सर्वात हळू आवाजाच्या १००पट मोठा आवाज; ३० dB म्हणजे हजारपट मोठा आवाज, वगै
🌺आवाजाच्या काही स्रोतांचे डेसिबेल मापन🌺
ऐकू येणारा सर्वात हळू आवाज (जवळजवळ पूर्ण शांतता) – शून्य dB
कुजबूज – १५ dB
सामान्य संभाषण – ३० dB
वाहनाचा किंवा यंत्राचा आवाज – ५० ते ६० dB
कारखान्याचा आवाज – ८० ते १०० dB
डॉल्बीचा
शरीर अवयव कान माहिती
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now