2 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 2 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.
2 जुलै 2021 चालू घडामोडी
दिनविशेष
- आज २ जुलै – जागतिक युएफओ (UFO) दिन
- १६९८: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.
- १८५०: बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
- १८६५: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
- १९४०: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
- १९६२: रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
- १९७२: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
- १९८३: कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
- १९९४: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
- २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
- २००२: स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
२ जूलै – जन्म
- १८६२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म. १८७७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.
- १८८०: श्रेष्ठ गायक, नट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)
- १९०४: फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)
- १९०६: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.
- १९२२: फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.
- १९२३: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.
- १९२५: काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
- १९२६: विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.
- १९३०: अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.
२ जुलै – मृत्यू
- ⚜ १५६६: जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५०३)
- ⚜ १७७८: फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन. (जन्म: २८ जून १७१२)
- ⚜ १८४३: होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १७५५)
- ⚜ १९५०: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
- ⚜ १९६१: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८९९)
- ⚜ १९९९: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर१९२०)
- ⚜ २००७: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
- ⚜ २०११: कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)
- ⚜ २०१३: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)