Learn For Dreams
Mpsc Science Questions Practice Question Set – 1.. Download Pdf Solve Online Test….
21) अ) वायूंना विशिष्ट आकार व आकारमान दोन्ही नसतात.
ब) वायूंमध्ये आंतरआण्वीय बंध अतिशय क्षीण नसतो.
वरील विधान व स्पष्टीकरणाच्या आधारावर खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
1) विधान अ योग्य मात्र ब त्याचे उचित स्पष्टीकरण नाही.
2) विधान ब योग्य मात्र अ विधानाशी संयुक्तिक नाही.
3) विधान अ व ब दोन्ही चूक आहेत.
4) विधान अ योग्य असून ब त्याचे योग्य स्पष्टीकरण आहे.
उत्तर :- 4
22) आवर्तसारणीत 11 अधातू वायू अवस्थेत आहेत, तर उर्वरीत स्थायू अवस्थेत म्हणजेच अधातू हे स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात मात्र एक मूलद्रव्य या गुणधर्माला अपवाद आहे. तो मूलद्रव्य खालीलपैकी कोणता ?
1) ब्रोमीन
2) क्लोरीन
3) स्कॅन्डीअम
4) आयोडीन
उत्तर :- 1
23) खालील विधानांचा विचार करा.
अ) RBC (लाल रक्तपेशी) या गोलाकार, व्दिअंतर्वक्र आणि केंद्रक नसलेल्या पेशी असतात.
ब) लाल रक्तपेशीला ल्युकोसाइट (Leucocyte) म्हणतात.
क) WBC (पांढ-या पेशी) RBC (लाल रक्तपेशी) पेक्षा आकाराने मोठया असतात.
ड) पांढ-या पेशीला एरिथरोसाइट म्हणतात.
1) अ, ब बरोबर 2) अ, क बरोबर
3) क, ड बरोबर 4) ब, ड बरोबर
उत्तर :- 2
24) अ) फ्लोरोसंट टयूब तसेच निऑन टयूब यात प्लाझ्मा असतो.
ब) आकाशात तारे चकाकण्याचे कारण प्लाझ्मा अवस्था आहे.
क) राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र चेन्नई येथे आहे.
वरीलपैकी असत्य विधान कोणते ?
1) फक्त अ 2) फक्त ब
3) फक्त क 4) वरील सर्व
उत्तर :- 3
25) सोडियम कायम रॉकेलच्या बाटलीत ठेवतात, कारण
1) हा जास्त क्रियाशील धातू आहे.
2) हा कमी क्रियाशील धातू आहे.
3) सोडियमचे ऑक्साईड आम्लारीधर्मी असतात म्हणून
4) यापैकी नाही
उत्तर :- 1
26) अ) सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 ला कोलकाता येथे झाला.
ब) त्यांना 1954 मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण सन्मान बहाल केला.
क) पदार्थाची पाचवी अवस्था BEC संशोधनात त्यांचे मोठे योगदान आहे.
वरीलपैकी सत्य विधान/विधाने कोणती ?
1) फक्त अ 2) फक्त ब, क
3) फक्त अ, ब 4) अ, ब, क तिन्ही
उत्तर :- 4
27) खालील धातूंचा अभिक्रियाशीलतेप्रमाणे योग्य चढता क्रम लावा.
अ) लोखंड ब) झिंक क) कॅल्शिअम ड) पारा
1) ब, क, ड, अ
2) ड, अ, ब, क
3) ब, क, अ, ड
4) ड, अ, क, ड
उत्तर :- 2
28) खालील विधानांचा विचार करा.
अ) लाल रक्तपेशी या केंद्रक नसलेल्या पेशी आहेत.
ब) ऊंट असा स्तनधारी प्राणी आहे, की त्याच्या लाल रक्तपेशीमध्ये केंद्रक आढळतो.
1) अ बरोबर 2) ब बरोबर
3) अ, ब चूक 4) अ, ब बरोबर
उत्तर :- 4
29) खालीलपैकी कोणते मूलभूत एकक आहे.
1) वॅट
2) ज्यूल – प्रतिसेकंद
3) ॲम्पीअर
4) न्यूटन
उत्तर :- 3
30) काही धातूंच्या ऑक्साईडला आम्लारीधर्मी ऑक्साइड म्हणतात, कारण की
1) धातूंचे ऑक्साइड पाण्यात विरघळत नाही.
2) धातूंचे सर्व ऑक्साइड आम्लारी असतात.
3) धातूंचे ऑक्साइड पाण्यात विरघळयानंतर आम्लारी तयार करतात.
4) यापैकी नाही
उत्तर :- 3
All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now