9 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

9 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 9 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.

9 जुलै 2021 चालू घडामोडी

9 जुलै 2021 चालू घडामोडी

दिनविशेष

  • १८७३: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
  • १८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.
  • १८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.
  • १९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
  • १९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
  • २०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.
  • २०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

९ जूलै – जन्म

  • १६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन यांचा जन्म.
  • १७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म.
  • १८१९: शिवणयंत्राचा संशोधक एलियास होव यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८६७)
  • १९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म. (मृत्यू: ६ मार्च १९८२)
  • १९२५: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर १९६४)
  • १९२६: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ बेन मॉटलसन यांचा जन्म.
  • १९३०: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २०१४)
  • १९३८: चित्रसृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला ऊर्फ संजीव कुमार यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)
  • १९४४: भारतीय-इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जूडिथ एम. ब्राउन यांचा जन्म.
  • १९५०: युक्रेन चे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म.
  • १९७१: “नेटस्केप” चे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म.

९ जुलै – मृत्यू

  • १८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)
  • १९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८५५)
  • १९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८९६)
  • १९९३: संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन.
  • २००५: महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री डॉ. रफिक झकारिया यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *