Learn For Dreams
4G टेक्नोलॉजी संपूर्ण माहिती
सध्या तंत्रज्ञानाचे युग असून 1G पासूनची भरारी 4G पर्यंत घेतली आहे .आज सर्वत्र 4G ची चर्चा चालू आहे . मग नेमकं काय आहे 4G ची टेक्नोलॉजी याबाबत माहिती घेऊया
1G टेक्नोलॉजी
1G टेक्नोलॉजी पासूनच वायरलेस टेलिफोन म्हणजेच मोबाइल चा परिचय जगाशी आला .
मात्र अनलॉग सिग्नलवर आधारित 1G टेक्नोलॉजी मध्ये खराब आवाज येणे , मोबाइल हँडसेट चा मोठा आकार आणि वजन तसेच डाटा स्पीड अतिमंद अशा समस्या होत्या .
2G टेक्नोलॉजी
ही टेक्नोलॉजी डिजीटल सिग्नलवर आधारित असून याद्धारे आपण फ़ोन कॉल सोबतच इंटरनेटचाही आनंद घेऊ शकतो .
2G चा डाटा ट्रान्सफर स्पीड 236 kbps आहे . यामध्ये पिक्चर मॅसेज , टेक्स्ट मॅसेज , आणि मल्टीमेडिया मॅसेज आरामाने पाठविता येतात .
मात्र विडियो कॉल , विडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मोबाइल टिव्ही यात 2G अयशस्वी ठरते .
3G टेक्नोलॉजी
डाटा ट्रान्सफर स्पीड 21 Mbps आहे . यामुळे विडियो कॉल , विडियो कॉन्फ्रेंसिंग आणि मोबाइल टिव्ही या सुविधा सहज उपलब्ध मिळू लागल्या
यामुळे मोबाइल व लॅपटॉप साठी स्पेशल ऑनलाइन टिव्ही अप्लिकेशन आले .
सोबतच फ़ोन मध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील आला . याचा वापर विडियो कॉलिंग व सेल्फी साठी करू लागले .
4G टेक्नोलॉजी
यांच्यात इंटरनेटचा स्पीड 100 mbp ते 1 Gbps पर्यंत आहे .
यामुळे स्मार्टफोनवर विना बफरिंग टिव्ही पाहणे , विडियो कॉल करणे , चित्रपट , सॉफ्टवेयर , गेम्स डाउनलोड करणे आदि सुविधा अत्यंत जलद गतीने मिळू लागल्या .
तर चला 4G तंत्रज्ञान चा मनमुराद आनंद लुटूया ……….4G technology Information
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now