3 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download

3 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 3 September 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

1 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

3 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

कर्णधार विराट कोहली

3 September 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 सप्टेंबर 2021)

‘म्यू’ विषाणूवर लशींची परिणामकारकता कमी :

  • करोनाच्या नव्या म्यू या उत्परिवर्तित विषाणूवर लशींची परिणामकारकता कमी आहे. तो मोठ्या प्रमाणात लशींना प्रतिरोध करणारा आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
  • बी.1.621 असे शास्त्रीय नाव असलेल्या म्यू विषाणू हा कोलंबियामध्ये जानेवारी 2021 मध्ये प्रथम आढळला.
  • दक्षिण अमेरिका, युरोप येथे त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून करोना विषाणूचा हा प्रकार ब्रिटन, हाँगकाँग येथेही आढळला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेने मंगळवारी करोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या साप्ताहिक अहवालात दिली आहे.
  • मार्चपासून डब्ल्यूएचओच्या निरीक्षणाखाली असलेला म्यू हा पाचवा ‘निरीक्षणाधीन उत्परिवर्तन’ आहे.

PF खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर भरावा लागणार TAX :

  • केंद्र सरकारने नवीन आयकर नियमावली अधिसूचित केली आहे ज्या अंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाती (PF) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील.
  • तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळे खाते उघडले जाईल.
  • नवीन अधिसूचनेनंतर, सर्व कर्मचारी भविष्य निधी खाती करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जातील.
  • तसेच CBDT अधिसूचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही योगदानावर कोणताही कर लावला जाणार नाही.
  • परंतु 2020-21 आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल आणि त्याची स्वतंत्र गणना केली जाईल.
  • CBDT ने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की नवीन नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील.

3 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानाच्या नावातून वगळण्याचा निर्णय :

  • केंद्राने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केल्यानंतर एका महिन्यापेक्षाही कमी कालावधीनंतर आसाम मंत्रिमंडळाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव ओरंग राष्ट्रीय उद्यानाच्या नावातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
  • गुवाहाटीच्या उत्तर-पूर्वेस सुमारे 120 किमी अंतरावर ओरंग उद्यान आसामच्या सात राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे आणि गेंड्यांच्या पहिल्या तीन निवासस्थानांपैकी एक आहे.
  • तर देशात वाघांची संख्या सर्वाधिक असलेल्या क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे.
  • ओरंगला 1985 मध्ये वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले आणि 1999 मध्ये राष्ट्रीय उद्यानात सुधारित करण्यात आले.
  • राष्ट्रीय उद्यान राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने मार्च 2016 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले होते.

देशात लहान मुलांसाठी येणार करोनाची चौथी लस :

  • हैदराबादची स्वदेशी फार्मा कंपनी बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने काही अटींसह दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी दिली आहे.
  • तर या चाचण्या 5 ते 18 वर्षांच्या मुलांवर केल्या जातील.
  • तसेच देशात 10 ठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत.
  • डीसीजीआयकडून मुलांवर चाचण्यांसाठी परवानगी मिळालेली बायोलॉजिकल ई ही चौथी लस आहे.

3 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेत अखिल मराठी बुद्धिबळ संघटना विलीन :

  • महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने बोलविलेल्या ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेमध्ये अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेचे विलीनीकरण झाले.
  • त्याचबरोबर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भंडाऱ्याचे डॉक्टर परिणय फुके यांची एकमताने निवड करण्यात आली.
  • तर माजी अध्यक्ष पुण्याचे सिद्धार्थ मयूर यांची कार्याध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड झाली. सांगलीच्या अनिल ताडे यांची मुख्य कायदे सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
  • तसेच या सभेमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी पैकी 27 जिल्ह्यांतील जिल्हा बुद्धिबळ संघटनाना संलग्नता देण्यात आली.

कर्णधार विराट कोहलीचा नवीन विक्रम :

  • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने 23 हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर प्रस्थापित झाला आहे.
  • तर वेगवान धावा करण्याच्या यादीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींगसारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.
  • विराटने ओवलमध्ये इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत एक धाव करत 23 हजार धावा पूर्ण केल्या.
  • तसेच हा विक्रम प्रस्थापित करणारा जगातला सातवा खेळाडू ठरला आहे आणि भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

दिनविशेष :

  • सन 1752 मध्ये अमेरिकेत ग्रेगरियन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
  • श्रीमती अॅनी बेझंट यांनी 3 सप्टेंबर 1916 मध्ये होमरुल लीगची स्थापना केली.
  • महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्म 3 सप्टेंबर 1923 मध्ये झाला.
  • लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा जन्म 3 सप्टेंबर 1940 मध्ये झाला.
  • सन 1971 मध्ये कतारला स्वातंत्र्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *