3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 3 October 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.
3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी
‘टू डीजी’ औषध उत्पादन तंत्रज्ञान कंपन्यांना हस्तांतरित :
- कोविड 19 प्रतिबंधासाठीच्या 2 डीजी औषध निर्मितीचे तंत्रज्ञान उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आले असून त्यात सात ते आठ कंपन्यांचा समावेश आहे.
- भारताच्या महा औषध नियंत्रकांनी या औषधाच्या उत्पादनास आधीच हिराव कंदील दिला आहे.
- संरक्षण संशोधन व विकास संस्था, टाटा अॅडव्हान्सड सिस्टीम्स तसेच भारत फोर्ज यांनी आधुनिक तोफांचे तंत्रज्ञान विकसित केले असून त्यात 155 हॉवित्झर तोफांचा समावेश केला आहे.
- तर या तोफा जास्त पल्ल्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. त्यांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून येत्या काही दिवसात त्या लष्कराला सुपूर्द करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (2 ऑक्टोबर 2021)
लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचं अनावरण :
- 2 ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या राष्ट्रीय ध्वजाचं अनावरण करण्यात आलं आहे.
- महात्मा गांधीजींच्या 152व्या जयंतीनिमित्ताने हा तिरंगा तिथे लावण्यात आला असून त्याचं उद्घाटन लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.
- भारतीय लष्कराच्या 57 इंजिनिअर रेजिमेंटने हा सर्वात मोठा खादीचा ध्वज तयार केला असून तो लेहमध्ये समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर ठेवण्यात आला आहे.
- लेहमध्ये 2000 फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल 225 फूट आहे. तर ध्वजाची रुंदी 150 फूट इतकी आहे.
- तसेच हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचं वजन तब्बल 1 हजार किलो इतकं आहे.
- तर 57 इंजिनिअर रेजिमेंटच्या 150 जवानांनी मिळून हा ध्वज 2000 फूट उंचीच्या टेकडीवर नेला.
3 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी
कंगना रनौत उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची झाली ब्रँड अम्बेसेडर :
- अभिनेत्री कंगना रनौत आता उत्तर प्रदेश सरकारच्या एका महत्त्वाच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर झाली आहे.
- कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनच ही घोषणा करण्यात आली आहे.
- ODOP अर्थात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट या मोहिमेसाठी कंगनाची निवड करण्यात आली आहे.
- तर या मोहिमेमध्ये उत्तर प्रदेशमधील स्थानिक कारागिरीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- तसेच प्रत्येक जिल्ह्याची विशेष हस्तकला किंवा कारागिरी त्या जिल्ह्याची विशेषता म्हणून लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
- उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमध्ये तयार होणाऱ्या चिकनकारी, झारी झरदोझी, काला नमक राईस अशा अनेक गोष्टी इतर कुठेही होत नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.
आता WhatsApp वर दिसणार भारतीय रुपयाचं चिन्ह :
- लोकप्रिय मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) अनेक नवीन अपडेट्स जारी केली आहेत.
- तर या अपडेट्समार्फत, व्हॉट्सअॅपने आपल्या युझर्सना अनेक नवीन फीचर्स दिली आहेत. ही फीचर्स लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहेत.
- त्यापैकी एक नवं जबरदस्त फिचर म्हणजे व्हॉट्सअॅप पेमेंट्स (WhatsApp Payments) आहे. या फीचरद्वारे, आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अगदी सहज पैसे पाठवू शकतो.
- व्हॉट्सअॅपची कंपनी असलेल्या फेसबुकने आपल्या भारतीय युझर्ससाठी एक खास अपडेट जारी केलं आहे. हा बदल व्हॉट्सअॅप पेमेंट्स फीचरशी संबंधित आहे.
- कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल (GFF) 2021 मध्ये जाहीर केलं आहे की, आतापासून सर्व व्हॉट्सअॅप युझर्सच्या चॅट बॉक्समध्ये ‘₹’ हे भारतीय रुपयाचं चिन्ह समाविष्ट केलं जाईल. ज्यामुळे व्हॉट्सअॅप पेमेंट फीचर वापरणं सोपे होईल.
दिनविशेष:
- हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 मध्ये झाला.
- इराकला सन 1932 मध्ये युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.
- जनरल डी. बोनोच्या नेतृत्त्वाखाली इटलीने सन 1935 या वर्षी इथिओपिया पादाक्रांत केले.
- सन 1952 मध्ये युनायटेड किंग्डमने यशस्वीरित्या अण्वस्त्र शस्त्रांची चाचणी करून जगातील तिसरे परमाणु ऊर्जा सशस्त्र राष्ट्र बनले.