Learn For Dreams
24 April 2020 चालू घडामोडी
अमेरिकेने निर्बंध लादल्याने दोन्ही देशात तणाव असतानाच इराणने लष्करी उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडला असून तो कक्षेत प्रस्थापित करण्यात आला आहे, अशी माहिती इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डने दिली आहे.
तर गुप्त अवकाश कार्यक्रम सुरू असल्याचे संकेत इराणने वेळोवेळी दिले आहेत. दरम्यान हा उपग्रह सोडण्यात आल्याची खातरजमा इतर मार्गाने होऊ शकलेली नाही.
रेव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की, आम्ही लष्करी उपग्रह सोडला असून त्याचे नाव ‘नूर’असे आहे.तसेच इराणने जो उपग्रह सोडला आहे तो 425 कि.मी उंचीवरील कक्षेत असून इराणने सोडलेला तो पहिलाच लष्करी उपग्रह आहे.
इराणमधील शाररौद येथील तळावरून हा उपग्रह सोडण्यात आला असून हा तळ सिमनान प्रांतात आहे. द्रव व घन इंधनावर चालणाऱ्या मेसेंजर प्रक्षेपकाच्या मदतीने हा उपग्रह सोडण्यात आला.
जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) ‘मी बॅडमिंटन’ मोहिमेची जागतिक सदिच्छादूत म्हणून भारताची अव्वल खेळाडू पी. व्हीसिंधू हिची निवड करण्यात आली आहे.
तर बॅडमिंटन या खेळाविषयी असणारे प्रेम आणि आदर खेळाडूने या मोहिमेद्वारे व्यक्त करावा, असा उद्देश आहे.
अखंडता आणि प्रामाणिकपणा यांना अनुसरून ‘बीडब्ल्यूएफ’कडून पाच वर्षांपासून खेळाडूंना धडे दिले जात आहेत.
एचडीएफसीने खातेधारकांना लॉकडाउन दरम्यान गुड न्यूज दिली आहे. एचडीएफसीने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केली आहे. नवे दर आजपासून म्हणजे 22 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहेत.
करोना संकटामुळे मंदीचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली होती. त्यानंतर अन्य बँकाही व्याज दरांमध्ये कपात करत आहेत.
तर मंगळवारी एचडीएफसीने हाउसिंग लोनवरील रिटेल प्राइम लेंडिंग रेटमध्ये (RPLR) 0.15% कपात करण्याचे जाहीर केले.तसेच एचडीएफसीने, गृह कर्जाच्या व्याजदरात 0.15% कपात केल्याने नवे व्याजदर आता 8.05% ते 8.85% दरम्यान असतील.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून ७५ टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर अनेकांना आतापर्यंत यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या १५ दिवसांमध्ये भविष्य निर्वाह निधीनं १० लाख दावे निकालात काढले आहेत. याअंतर्गत एकू ३,६००.८५ कोटी रूपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. निकालात काढण्यात आलेल्या दाव्यांपैकी ६.०६ लाख दावे हे करोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढण्याची परवानगी सरकानं दिली आहे. करोनाच्या संकटात मदत म्हणून आपलं तीन महिन्यांचं मूळ वेतन किंवा भविष्य निर्वाह निधीत जमा असलेली ७५ टक्के रक्कम यापैकी जे काही कमी असेल ते काढण्याची परवानगी सरकानं दिली आहे.
24 April 2020 Chalu Ghadamodi in Marathi,24 April 2020 चालू घडामोडी
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now