17 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download

17 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 17 October 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.

 10 सप्टेंबर 2021 चालू घडामोडी
16 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download

17 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी PDF Download

17 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

17 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2021)

नासाच्या ‘लुसी’ यानाचे यशस्वी प्रक्षेपण :

  • सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी नासाच्या आणखी एका मोहिमेला सुरुवात झाली आहे.
  • तर सुमारे 1500 किलो वजनाचे आणि 6 मीटर लांबीचे दोन सोलर पॅनल असलेले ‘लुसी’हे यान ‘एटलास-5’ या प्रक्षेपकाने अमेरिकेतील फ्लोरिडा इथल्या तळावरुन यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित केले.
  • तसेच हे यान पुढील 12 वर्ष प्रवास करत गुरु ग्रहाजवळ असलेल्या 8 विविध लघुग्रहांजवळून जात त्यांची छायाचित्रे काढणार आहे. यामधून या लघुग्रहांचा अभ्यास केला जाणार आहे.
  • लघुग्रहांचे दोन मोठे समूह हे गुरु ग्रहांच्या समकक्ष मागे आणि पुढे गुरु ग्रहाबरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या लघुग्रहांना गुरु ग्रहाचे ट्रोजन ( Jupiter Trojan ) म्हणून ओळखलं जातं.
  • तर हे लघुग्रह सूर्यमालेच्या निर्मितीपासून अस्तित्वात आहेत असा खगोल अभ्यासकांचा कयास आहे. त्या वेळी मोठ्या ग्रहाची निर्मिती झाली नाही, पण त्याचे अवशेष हे या लघुग्रहांच्या रुपाने बाकी आहेत असा अंदाज आहे.
  • तेव्हा या लघुग्रहांचा अभ्यास हे ‘लुसी’ यान करणार आहे. यामुळे सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल मोठी माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • तसेच या लघुग्रहांची संख्या अडीच लाखापेक्षा जास्त आहे. एक किलोमीटर पासून ते 100 किलोमीटर पर्यंत व्यासाचे विविध आकाराचे हे लघुग्रह या Jupiter Trojan मध्ये आहेत.
  • तर यापैकी 8 मोठ्या लघुग्रहांचा अभ्यास ‘लुसी’ यान करणार आहे.
  • गुरु ग्रहाजवळील लघुग्रहांचा तेही एवढ्या संख्येने अभ्यास करणारी ही जगातील पहिलीच मोहिम असल्याचं नासाने म्हंटलं आहे.

17 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी

सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी चीनचे अवकाशवीर अवकाश स्थानकात :

  • चीनचे तीन अवकाशवीर शेनझाऊ 13 यानातून तियानहे या अवकाश स्थानकात गेले आहेत. शनिवारी त्यांनी अवकाशस्थानकात प्रवेश केला.
  • तर हे अवकाशवीर सहा महिने स्थानकात राहणार असून चीनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी अवकाश वास्तव्य मोहीम आहे.
  • तसेच जे तीन अवकाशवीर स्थानकात गेले आहेत त्यात झाई झियांग, वँग यापिंग, ये गुआंगफू यांचा समावेश आहे.
  • वँग ही अवकाश स्थानकात जाणारी पहिली चिनी महिला आहे.
  • हे अवकाशवीर अवकाश औषधे व भौतिकशास्त्रातील प्रयोग करणार असून दोन ते तीन स्पेसवॉक करण्याचा त्यांचा विचार आहे.

द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक :

  • माजी कर्णधार राहुल द्रविड आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याची माहिती शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिली.
  • संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे.
  • तर त्यामुळे त्यांच्यानंतर भारताच्या माजी खेळाडूनेच प्रशिक्षकपद स्वीकारावे, अशी ‘बीसीसीआय’ची इच्छा होती.
  • द्रविड सध्या बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख असून गेल्या सहा वर्षांपासून भारत ‘अ’ आणि 19 वर्षांखालील संघांतील बहुतांश खेळाडूंना घडवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

दिनविशेष :

  • 17 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन
  • 17 ऑक्टोबर 1831 मध्ये मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.
  • थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी 17 ऑक्टोबर 1888 मध्ये पेटंट दाखल केले.
  • पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये 17 ऑक्टोबर 1956 मध्ये सुरु झाले.
  • 17 ऑक्टोबर 1966 मध्ये बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार 17 ऑक्टोबर 1979 मध्ये देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *