15 ऑक्टोबर 2020 चालू घडामोडी
⭕️⭕️संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशन.
⭕️⭕️ 🏵संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना (FAO) याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त 16 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 75 रुपये एवढे मूल्य असलेल्या एका विशेष नाण्याचे प्रकाशन होणार आहे.
🎗भारत आणि अन्न व कृषी संघटना….
🏵देशातल्या दुर्बल घटक आणि सर्वसामान्य जनतेला आर्थिक तसेच पोषक आहारादृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी, अन्न आणि कृषी संघटनेने आजवर केलेले कार्य अतुलनीय आहे. भारतीय सनदी अधिकारी डॉ. बिनय रंजन सेन यांनी वर्ष 1956-1967 मध्ये या संस्थेचे महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळली.
🏵वर्ष 2016 हे डाळींसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून आणि वर्ष 2023 हे बाजरीसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करावे, अशा भारताच्या दोन्ही प्रस्तावांचे अन्न आणि कृषी संघटनेने स्वागत आणि कौतुक केले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) मार्गदर्शनाखाली, कार्यरत राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेने गेल्या पाच वर्षात असे 53 वाण विकसित केले आहेत.
🏵2014 पूर्वी असे बायोफोर्टीफाईड म्हणजेच, अधिक पोषणमूल्य असलेले केवळ एकच वाण विकसित झाले होते. संयुक्त राष्ट्रसंघ अन्न व कृषी संघटना
🏵संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायमस्वरूपी प्रातिनिधिक संस्थांपैकी 16 ऑक्टोबर 1945 रोजी क्वेबेक (कॅनडा) येथे स्थापना झालेली ही पहिली संस्था आहे. FAOच्या सदस्य व सहसदस्य देशांची संख्या 197 आहे. भारत FAOचा स्थापनेपासूनचा सभासद आहे.
🏵जगातल्या सर्व देशांमधल्या लोकांचे आहारपोषण व जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तेथील कृषी, मत्स्योद्योग व वनोद्योगांचा विकास होत जाणार असे प्रयत्न करणे, हे FAOचे प्रधान उद्दिष्ट आहे.
⭕️⭕️भारत आणि फ्रान्सची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या तिसऱ्या परिषदेसाठी अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष म्हणून फेरनिवड
⭕️⭕️ ⭕️आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या तिसऱ्या संमेलनासाठी 34 ISA सभासद मंत्र्यांची उपस्थिती होती. संमेलनात 53 सभासद देश आणि 5 स्वाक्षरी करणारे आणि संभाव्य सदस्य देशांचा सहभाग होता.
🔶आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष म्हणून भारत आणि फ्रान्स यांची दोन वर्षाच्या कालावधीसाठी 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या तिसऱ्या आभासी बैठकीत फेरनिवड झाली.
📌शाश्वत हवामान कृती आघाडीच्या माध्यमातून खासगी आणि सार्वजनिक कॉर्पोरेट क्षेत्रातील ISA च्या सहभागीतेसाठी आयएसए सचिवालयाच्या पुढाकारांना संमेलनात मान्यता दिली. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दहा संस्थांनी संमेलनाला प्रत्येकी 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढा धनादेश सुपूर्द केला.
⭕️अध्यक्षपदावरुन बोलताना ऊर्जा, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी हवामानबदला विरोधात सर्व सदस्य देशांनी एकत्र येऊन काम करण्याच्या निर्णयाची प्रशंसा केली. तिसऱ्या संमलेनात उष्णता आणि थंडी यासंदर्भातील सातव्या उपक्रमावर चर्चेस सुरुवात केल्याचे त्यांनी स्वागत केले. गेल्या पाच वर्षांत सौर ऊर्जेत वाढ झाली असून आता जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा ऊर्जा स्रोत आहे, असे सिंग म्हणाले. जागतिक ऊर्जेच्या 2.8% वाटा सौर ऊर्जेचा आहे आणि हे असेच सुरु राहिले तर 2030 पर्यंत जगाच्या मोठ्या भागात सौर ऊर्जा ऊर्जेचा सर्वात महत्त्वाचा स्रोत ठरेल.
📌आयएसएचे पहिले संमेलन 2 ते 5 ऑक्टोबर 2018 दरम्यान, ग्रेटर नोएडा येथे पार पडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अन्तोनिओ गुत्तरेस यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते. दुसरेकफपाप संमेलन 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2019 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडले होते. या संमेलनात 78 देशांचा सहभाग होता. तिसरे संमेलन सध्या 14 ते 16 ऑक्टोबर 2020 दरम्यान आभासी पद्धतीने होत आहे.
🔶आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 1.3 टक्के एवढी घसरण होण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्याच्या ‘ए लॉन्ग अँड डिफिकल्ट अॅसेंट’ या शीर्षकाच्या सुधारित अहवालात व्यक्त केला आहे.
🔴इतर ठळक बाबी…
🔶पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेऊन 8.8 टक्क्यांचा विकासदर गाठण्याची अपेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. कोविड-19 महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 4.4 टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
🔶जून महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेच्या घसरणीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा आता त्यामध्ये 0.8 टक्क्यांनी अधिक घट होण्याची अपेक्षा वर्तविली गेली आहे. जगाच्या शीत प्रदेशामध्ये (युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व आशिया) हवामान बदलामुळे होणारे नुकसान हे उष्ण प्रदेशांपेक्षा कमी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
🔴आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी…
🔶आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.
🔶आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.
स्पर्धामंत्र – मी अधिकारी होणारच
⭕️⭕️गोलंदाजाने त्रिफळा उडवल्यावर सॅम करनही झाला अवाक.
⭕️⭕️ ☄हैदराबादविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या.
☄चेन्नईच्या डावाची सुरूवात खराब झाली होती, पण मधल्या षटकांमध्ये शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या अनुभवी जोडीने केलेल्या 81 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली.
☄जाडेजाने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत संघाला 160च्या पार मजल मारून दिली.हैदराबादकडून फिरकी गोलंदाजांना यश मिळाले नाही पण वेगवान गोलंदाजांनी मात्र प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
☄नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेत पहिल्यांदा CSKला आधी फलंदाजीची संधी मिळाली.नियमित सलामीवीर फाफ डु प्लेसिससोबत आजच्या सामन्यात सॅम करनला पाठवण्यात आलं. डु प्लेसिस शून्यावर बाद झाला.
☄सॅम करनने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली होती. खलील अहमदच्या गोलंदाजीवर करनने एकाच षटकात 2 चौकार आणि 2 षटकार लगावले होते. पण संदीप शर्माने त्याला स्विंग गोलंदाजीची कमाल दाखवत 31 धावांवर त्रिफळाचीत केलं.
Sr No. | तारीख | Pdf डाउनलोड करा |
1 | 19 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
2 | 20 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
3 | 23 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
4 | 24 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
5 | 28 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
6 | 30 सप्टेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
Sr No. | तारीख | Pdf डाउनलोड करा |
1 | 1 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
2 | 2 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
3 | 3 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
4 | 4 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
5 | 5 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
6 | 6 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
7 | 7 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
8 | 8 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
9 | 10 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
10 | 11 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
11 | 12 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download now |
12 | 13 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download Now |
13 | 14 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download Now |
14 | 15 ऑक्टोबर 2020 चालु घडामोडी | Download Now |
Nov 2020 Chalu Ghadamdi Pdf | Download now |
Sr No. | तारीख | Pdf डाउनलोड करा |
1 | 1 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
2 | 2 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
3 | 3 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
4 | 4 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
5 | 5 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
6 | 6 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
7 | 7 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
8 | 8 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
9 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now | |
9 | 10 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
10 | 11 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
11 | 12 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
12 | 13 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
13 | 14 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
14 | 15 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
15 | 16 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
16 | 17 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
17 | 18 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
18 | 19 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
19 | 20 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
20 | 21 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
21 | 22 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
22 | 23 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
23 | 24 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
24 | 25 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
25 | 26 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
26 | 27 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
27 | 28 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
28 | 29 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |
29 | 30 नोव्हेंबर 2020 चालु घडामोडी | Download now |