10 मे 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

10 मे 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा तीन भारतीय छायापत्रकारांना पुलित्झर पुरस्कार जाहीर.

10 मे 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

तीन भारतीय छायापत्रकारांना पुलित्झर पुरस्कार जाहीर.

अनुच्छेद 370 हटवल्यानंतरचे जम्मू व काश्मीर टिपणाऱ्या दार यासीन, मुख्तार खान आणि चान्नी आनंद या तीन भारतीय छायापत्रकारांना जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे.

तिघांनी जम्मू व काश्मीरचे कलम 370 हटवल्यानंतरचे लक्षवेधी चित्र मांडले; त्याबद्दल त्यांना जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.

पुरस्काराविषयी..

पुलित्झर पुरस्कार हा पुरस्कार वृत्तपत्र, मासिकपत्र आणि ऑनलाइन पत्रकारिता, साहित्य आणि संगीत रचना या क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीसाठी दिला जातो. हा अमेरिकेचा पुरस्कार आहे. पुलित्झर पुरस्कार 21 गटांतर्गत सर्वोत्तम सेवांना पुरस्कार दिला जातो.

1917 साली अमेरिकेचे प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांनी या पुरस्काराची स्थापना केली. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे या पुरस्काराचे व्यवस्थापन आहे.

दहा हजार डॉलर रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

इराणने आपल्या चलनामधून चार शून्य हटवले.

इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने आपले रियाल हे चलन बदलून त्याऐवजी तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.


तर बदललेल्या चलनानुसार एका तोमानची किंमत ही 10 हजार रियाल इतकी असणार आहे.

अमेरिकेने इराणवर टाकलेल्या प्रतिबंधांमुळे मागील काही महिन्यांपासून इराणी चलनाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळालं होतं.

हीच घसरण थांबवण्यासाठी इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच सोमवारी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आलं.

10 मे 2020 चालू घडामोडी डाउनलोड करा

❇ विद्यार्थ्यांना दिलासा : पदवी-पदव्युत्तरचे अंतिम वर्ष वगळता इतर वर्गाच्या परीक्षा रद्द : उदय सामंत

मुंबई : पदवी आणि पदव्युत्तरच्या फक्त अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता इतर वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आले आहेत, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केली.

ते म्हणाले, यूजीसीने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत.

अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै महिन्यात होणार आहेत. तसेच 15 ऑगस्ट पर्यंत यांचे निकाल लावले जातील.

बीए हा तीन वर्षांचा कोर्स असतो. त्यामध्ये एकूण सहा सेमीस्टर असतात. त्यातील फक्त सहाव्या सेमीस्टरची परीक्षा घेतली जाणार आहे.

बीकॉमसाठी देखील तीन वर्षांचा कालावधी असतो. तिथे देखील अशा प्रकारेच परीक्षा घेतली जाणार आहेत फक्त जिथे 8 सेमीस्टर आहेत तिथे आठव्या सेमीस्टरची, 10 सेमीस्टर असतील तिथे 10 व्या सेमीस्…

❇ ​”तोमान”: इराण देशाचे नवे राष्ट्रीय चलन

  • इराण देशाने त्यांचे अधिकृत राष्ट्रीय चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने ‘इराणी रियाल’ हे चलन बदलून त्याऐवजी ‘इराणी तोमान’ हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • बदललेल्या चलनानुसार एका तोमानचे मूल्य हे 10 हजार रियाल एवढे असणार आहे.
  • 4 मे 2020 रोजी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातला विधेयक मंजूर करण्यात आला आणि राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली.
  • केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
  • संयुक्त राज्ये अमेरिका देशाने इराणबरोबरचा अणुकरार रद्द करण्याबरोबरच इराणवर अनेक आर्थिक निर्बंधही लादले.
  • याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य 60 टक्क्यांपर्यंत घसरले आणि रियाल डॉलरच्या तुलनेत एक लक्ष 56 हजार इतका घसरला आहे.
  • इराणी चलनाची किंमत घसरल्याने महागाई वाढली. हीच घसरण रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला.

▪️इराण देश

  • इराण हा मध्यपूर्वेतला एक देश आहे. तेहरान ही राजधानी आहे आणि रियाल हे अधिकृत चलन आहे.

All Exam Booklist Download

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *