1 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 1 August 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.
1 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी
दिनविशेष
१७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले. १८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले. १९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले. १९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला. १९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली. १९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले. १९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली. १९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. २००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. २००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.
१ ऑगस्ट– जन्म
ख्रिस्त पूर्व १०: रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म. १७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर१८२९) १८३५: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर – पुणे) १८८२: भारतरत्न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२) १८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६) १९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२) १९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म. १९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९६९) १९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९६७) १९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७२) १९४८: मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म. १९५२: क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्म. १९५५: क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म. १९६९: इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.
१ ऑगस्ट – मृत्यू
११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १०८१) १९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: २३ जुलै १८५६ – रत्नागिरी) १९९९: बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर१८९७ – किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश) २००५: सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२१) २००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१६) २००८: क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन
Related