Learn For Dreams
बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार
बेरोजगार म्हणजे ज्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा आहे परंतु काम मिळत नाही.
बेरोजगारीचे प्रकार
अ. शहरी बेरोजगारी
१. संरचनात्मक बेरोजगारी – ही बेरोजगारी ‘मजुरांची मागणी कमी व पुरवठा जास्त’ या अवस्थेमुळे उद्भवते. औद्योगिक विकासदर कमी असल्याने पुरेसा रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही .
२. शैक्षणिक / सुशिक्षित बेरोजगारी – शिक्षण घेऊनही काम न मिळणे म्हणजे शैक्षणिक बेरोजगारी होय. याचे मूळ कारण संथ आर्थिक विकास हे आहे. तसेच, सदोष शिक्षण व्यवस्था, तांत्रिक शिक्षणाचा अभाव, योग्य शिक्षण पातळीचा अभाव, शिक्षित लोकांच्या मागणी व पुरवठ्यातील मोठी तफावत ही इतर कारणे आहेत.
३. कमी प्रतीची / न्यून बेरोजगारी – इच्छित कार्याक्षामातेपेक्षा कमी प्रतीचे काम करावे लागणे म्हणजेच न्यून बेरोजगारी होय .
४. घर्षनात्मक बेरोजगारी – जेव्हा कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्यास घर्षनात्मक बेरोजगारी म्हणतात. यास यांत्रीकुत बेरोजगारी असेही म्हणतात कारण ती तंत्रज्ञान बदलामुळे घडून येते .
५. चक्रीय बेरोजगारी – विकसित भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते .
६. प्रासंगिक बेरोजगारी – करारावर काम करणाऱ्या कामगारांना करार संपल्यानंतर पुढील काम मिळेपर्यंत या बेरोजगारीला सामोरे जावे लागते .
ब. ग्रामीण बेरोजगारी
१. हंगामी बेरोजगारी – ही बेरोजगारी मुख्यता शेती क्षेत्रात दिसून येते. तसेच ही बेरोजगारी पर्यटन क्षेत्र, आईस्क्रीमचे कारखाने, इत्यादी ठिकाणीही निर्माण होते .
२. प्रच्छन्न / अदृश्य बेरोजगारी – आवश्यकतेपेक्षा जास्त लोकं एकाच कामात गुंतलेले असल्यास त्या जास्तीच्या व्यक्तींना अदृश्यपणे किंवा प्रच्छन्नपणे बेरोजगार असे म्हटले जाते . हा प्रकार मुख्यत्वे शेती क्षेत्रात दिसून येतो . या बेरोजगार व्यक्तींची सीमांत उत्पादकता शून्य असते.
बेरोजगारी कमी करण्याचे उपाय –
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit NowWhatsAppTelegramFacebookTwitter
One thought on “बेरोजगारी व बेरोजगारीचे प्रकार”