प्रमुख भू प्रकार सर्व Mazasarav वर फक्त…….
क्षरण प्रक्रियेत वारा हे अत्यंत महत्त्वाचे कारक आहे. वार्याचे बहुतांशी कार्य शुष्क वाळवंटी प्रदेशात आढळून येते.
वार्याचे कार्य प्रामुख्याने खनन, वहन व संचयन या प्रकारे होते. वार्याचे खनन कार्य प्रामुख्याने ३ प्रकारे होते. वार्यामुळे एखाद्या ठिकाणची रेती थेटपणे उचलून नेण्याच्या प्रक्रियेस अपवहन असे म्हणतात. अपघर्षण क्रियेत वार्यासोबत असणारे रेतीचे कण खडकांवर घासले जाऊन खडकांची झीज होते. तर रेतीचे कण एकमेकांवर आदळून विभाजीत होण्याच्या क्रियेस सन्निघर्षण असे संबोधले जाते. वार्याच्या खनन कार्याची तीव्रता प्रामुख्याने वार्याचा वेग, रेतीच्या कणांचा आकार, खडकांचे स्वरूप व हवामान यावर अवलंबून असते.
वार्यासोबत पुढीलप्रकारे गाळाचे वहन होते. निलंबन क्रियेत बारीक रेतीचे कण पृष्ठभागाला न स्पर्श करता वार्यासोबत वाहून नेले जातात. उत्प्लवन क्रियेत रेतीचे कण चेंडूप्रमाणे उड्यांच्या अवस्थेत पुढे जातात तर कर्षण क्रियेत मोठ्या आकाराचे कण पृष्ठभागावरून घरंगळत अथवा घर्षण करत वाहून नेले जातात. वार्यामुळे निर्माण होणार्या भूरूपाचे क्षरण भूरूप व संचयन भूरूप असे प्रकार पडतात.
क्षरण भूरूपे-
१) अपवहन कुंड वार्यामुळे एखाद्या ठिकाणची रेती उडून जाऊन निर्माण झालेल्या उथळ खड्यास अपवहन कुंड असे म्हणतात.उदा. इजिप्त वाळवंटातील कतारा हे अपवहन कुंड
२) भूछत्र खडक जमिनीपासून अंदाजे १ मीटर उंचीवर वार्यासोबतच्या कणामुळे खडकांची जास्त झीज होते. परिणामी उंचीवर रूंद व जमिनीलगत अरूंद अशा भूछत्राची निर्मिती होते. उदा. सहारा वाळवंटात अनेक भूछत्र खडक आढळतात.
३) द्विपगिरी सपाट वाळवंटीप्रदेशात वर आलेल्या अलिप्त टेकड्यांना द्विपगिरी असे म्हणतात. त्यांचा उतार सरळ असून घुमटासारखा या द्विपगिरी बहुतांशी ग्रेनाइटच्या बनल्या असतात. उदा. ऑस्ट्रेलिया वाळवंटातील ऐरिस द्विपगिरी
४) टोपणशीला तुलनेने कठीण खडक वरच्या भागात व मृदू खडक खालच्या भागात असणार्या वाळवंटातील स्तंभास टोपणशील असे म्हणतात. कठीण व मऊ खडकांच्या असंगत क्षरण क्रियेमुळे यांची निर्मिती होते.
५) ज्यूजेन वाळवंटात एकमेकास समांतर असे क्षितिजसमांतर कठीण व मृदू खडक आढळतात. कठीण खडकांना पडलेल्या भेगांची झीज होऊन मोठ्या खाचा निर्माण होतात. हळूहळू त्यांची खोली वाढून त्याखालील मृदू खडकाची देखील झीज होते. या वैशिष्टयपूर्ण कटक आणी खाच या भूरूपास ज्यूजेन असे म्हणतात. उदा. कॅलोरेडो वाळवंआत वैशिष्टयपूर्ण ज्यूजेन आढळतात.
६) यारदांग यांची रचना ज्यूजेन प्रमाणेच असते. परंतू ज्यूजेन मधील मृदू व कठीण खडकांच्या आडव्या स्तराऐवजी त्याचे उभे स्तर आढळतात.
७) मेसा व बुट्टे मेसा या स्पॅनीश शब्दाच्या अर्थ मंचक असा होतो. वाळवंटी प्रदेशात कठीण खडकांची फारशी झीज होत नाही. परिणामी त्यापासून सरळ बाजू असलेल्या बुट्ट्यांची मेसांची निर्मिती होते. उदा. एरिझोना वाळवंटातील मंचक. बराच काळ मेसाची झीज होऊन आकाराने छोट्या मंच निर्माण होतात.
८) वातघ्रुष्ट रेतीच्या घर्षण क्रियेमुळे दगडगोट्यांना पैलू निर्माण होतात. या पैलूदार दगडगोट्यास वातघ्रुष्ट असे म्हणतात. ३ बाजूच्या वातघ्रुष्टास त्रैनिकतर २ बाजूच्या वातघ्रुष्टास ब्दैनिक असे म्हणतात.
९) वातखिडकी सततच्या घर्षणक्रियेमंळे वाळवंटातील खडकास छिद्रे पडतात. ही छिद्र रूंद होऊन वातखिडकी निर्मिती होते.
१०) हमादा पृष्ठ भागावरील रेती वाहून जाऊन उघड्या पडलेल्या खडकाळ पृष्ठभागास हमादा असे म्हणतात.
युवावस्था अवस्थेत पर्वतीय प्रदेशात नदीचा उगम होतो. पाण्यांचे आकारमान कमी असले तरी देखील तीव्र उतारामुळे उर्ध्व खनन प्रभावी असते. या अवस्थेस पुढील भूरूपांची निर्मिती होते.
नदी प्रमुख भूरूपे –
नदी युवावस्था अवस्थेत पर्वतीय प्रदेशात नदीचा उगम होतो. पाण्यांचे आकारमान कमी असले तरी देखील तीव्र उतारामुळे उर्ध्व खनन प्रभावी असते. या अवस्थेस पुढील भूरूपांची निर्मिती होते.
१) ‘व्ही’ आकाराची दरी तीव्र उर्ध्व खननामुळे तळभागाची खोली वाढून ‘व्ही’ आकाराच्या दरीची निर्मिती होते.
२) निदरी व घळई अत्यंत तीव्र उताराच्या बाजू असलेल्या अरूंद दरीस निदरी असे म्हणतात. जेव्हा या निदरीच्या बाजूंचा उतार अत्यंत तीव्र व खोली अतयंत जास्त असते तेव्हा त्यास घळई असे संबोधले जाते. उदा. कोलोरॅडो नदीवरील ग्रँड घळई.
३) धावत्या/धावते/ध्रुतवाह नदीच्या उतारावर मृदु व कठीण खडकांमुळे उंचसखलपणा निर्माण होतो, याला धावते असे म्हणतात. असे अनेक धावते एकत्र येऊन महाप्रपातांची निर्मिती होते. उदा. नाईल नदीवरील धावते.
४) धबधबा उंच कड्यावरून जलप्रवाह खाली कोसळून धबधब्यांची निर्मिती होते. धबधब्याच्या तळाशी निर्माण झालेल्या सरावरास प्रपात कुंड असे म्हणतात. उदा. जोग धबधबा. शरावती नदीवरील जोग धबधब्यामुळे ४० मीटर प्रपात कुंड निर्माण झाले आहे.
५) रांजण खळगे नदीच्या पात्रात खडकांच्या चक्राकार खणनामुळे निर्माण झालेल्या खळग्यांना रांजण खळगे असे म्हणतात. हे खळगे गोलाकृतीय असतात. उदा. गोदावरी नदीतील रांजण खळगे.
६) नदीचे अपहरण दोन प्रवाहादर्या जलविभागाची झीज होऊन एका प्रवाहाचे पाणी दुसर्या प्रवाहाकडे वळण्याच्या क्रियेस नदी अपहरण असे म्हणतात. अपहरण करणार्या क्रियाशील प्रवाहास अपहणकर्ता प्रवाह तर अपहरण झालेल्या प्रवाहास अपहृत प्रवाह असे संबोधले जाते. ज्या ठिकाणी ही अपहरणाची प्रक्रिया घडून येते. त्यास अपहरणांचा कोपरा असे म्हणतात. उदा. म्यानमार मध्ये इरावती नदीने सिटांग नदीचे अपहरण केले आहे.
पाच प्रकारची वनस्पती मी अगदी बोलू शकतो उष्णकटिबंधीय सदाहरित वन, उष्णदेशीय पर्णपाती वन,पाने, नालीदार वनस्पतीआणि मॅंग्रोव्ह जंगले
ज्या भागात मुसळधार पाऊस पडतो अशा ठिकाणी उष्णकटिबंधीय रेन फॉरेस्ट्स आढळतात. ते इतके दाट आहेत की सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाही. या जंगलांमध्ये बरीच प्रकारच्या झाडे आढळतात, जी वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी त्यांची पाने टाका. म्हणूनच, ते नेहमी हिरवे आणि दिसतात
सदाहरित जंगल म्हणतात. या जंगलात आढळणारी महत्वाची झाडे म्हणजे महोगनी, आबनूस आणि
रोझवुड. अंदमान निकोबार बेटे, उत्तर-पूर्व राज्यांचा काही भाग आणि एक अरुंद पट्टी
पश्चिम घाटातील पश्चिम उतार या जंगलांचे घर आहे.
आपल्या देशाच्या मोठ्या भागात आपल्याकडे या प्रकारचे वन आहे.
या जंगलांना पावसाळ्याची वने देखील म्हणतात. ते कमी दाट असतात. त्यांनी त्यांची पाने ए येथे टाकली वर्षाचा विशिष्ट वेळ या जंगलांची महत्त्वपूर्ण झाडे साल, सागवान, पीपल, कडुनिंब आणि आहेत शिशम. ते मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड,
ओडिशा, आणि महाराष्ट्राच्या काही भागात.
थोड्या झुडुपे या प्रकारच्या वनस्पती देशातील कोरड्या भागात आढळतात. पाने आत आहेत
पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी मणक्याचे स्वरूप. कॅक्टस, खैर, बबूल, केकर हे महत्वाचे आहेत आणि राजस्थान, पंजाब, हरियाणा, पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील उतार आणि
गुजरात.
उंचीच्या भिन्नतेनुसार पर्वतांमध्ये प्रजातींची विस्तृत श्रृंखला आढळते. सह
उंची वाढ, तापमान कमी. 1500 मीटर ते 2500 मीटर दरम्यान उंचीवर
बहुतेक झाडे शंकूच्या आकाराचे असतात. या झाडांना शंकूच्या आकाराचे झाड म्हणतात. चिर, पाइन आणि देवदार या जंगलांची महत्त्वाची झाडे आहेत.
वनराई वाढवा ही जंगले खार्या पाण्यात टिकू शकतात. ते प्रामुख्याने आढळतात
पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये सुंदरबन्स. सुंदरी सुप्रसिद्ध आहे
मॅंग्रोव्ह जंगलातील वृक्षांच्या प्रजाती, ज्यानंतर सुंदरबनची नावे देण्यात आली आहेत.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
भारताचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड करा, भारत पिके,भारत लोकसंख्या, भारतातील धर्म, भारतातील खनिज संपत्ति , भारत वने व वनांचे प्रकार