Learn For Dreams
TET परिक्षा अपडेट अभियोग्यता चाचणी पुढे ढकलण्यात आली अजून घोटाळा समोर बघा सविस्तर माहिती
TET परीक्षा अभ्यासक्रम २०२२-२३: शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. मुळात टीईटी परीक्षा राज्य सरकार आणि केंद्र सरकार देखील घेईल. या पृष्ठामध्ये आम्ही सर्व राज्य टीईटी आणि सीटीईटी परीक्षा 2022 अभ्यासक्रमाची यादी करण्याचा प्रयत्न करू.
पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी – प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१ | मराठी | इंग्रजी | उर्दु | बंगाली / गुजराती / तेलुगू / सिंधी / कन्नड / हिंदी |
भाषा-१ | इंग्रजी | मराठी | मराठी किंवा इंग्रजी | मराठी किंवा इंग्रजी |
३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :-
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व ११ ते १४ वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व ११ ते १४ वयोगटाशी सबंधित प्रचलित बी. एड. अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारीत विहित केलेला व सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.