पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

पोलीस भरतीची प्रक्रिया साधारणपणे ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होऊ शकते. मित्रांनो, तुम्ही नियोजनपूर्वक अभ्यास केला तरच यश मिळू शकते. सर्वप्रथम गणित, बुद्धीमापन आणि मराठी हे विषय पक्के झालेत का बघा. या विषयात पैकीच्या पैकी गुण घेता येतात. सामान्य ज्ञानावरती अधिक भर न देता चालू घडामोडी घटकावरती भर द्या. प्रत्येक घटकासाठी एकच संदर्भ पुस्तक वापरा. मराठी-बाळासाहेब शिंदे, गणित – Master of Maths, बुद्धीमापन – अंकलगी, सामान्यज्ञान – सुरज शेख किंवा नवनीत जनरल नॉलेज.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

मची सकाळी शारीरिक तयारी झाल्यानंतर सकाळच्या सत्रात यापूर्वी झालेले पोलीस भरती प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवा. १०० पैकी किती गुण पडतात बघा व कुठे चुकले तेही बघा. संध्याकाळच्या सत्रात सराव पेपर सोडवा. सध्या जास्तीत जास्त भर प्रश्नपत्रिका सोडवण्यावर द्या. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला आहात, त्या जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यास करा.

जितका अधिक सराव कराल तेवढे यश तुमचेच असेल. सराव वेळ लावून करा. प्रश्नाची उत्तरे चुकल्यास तत्काळ संदर्भ काढून पहा आणि मगच पुढची प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्न सोडवत असताना चारही पर्यायांचा विचार करा. अधिकाधिक चिंतन करा. यातील तांत्रिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती 2020
पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

अभ्यास कसा करावा ?

  1. कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी “मनाच्या एकाग्रतेची” गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.
  2. मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करुन घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्यायदेखील नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करुन घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.
  3. स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

  1. योगी जन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करुन घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करुन परमसत्याची प्राप्ती करुन घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे.
  2. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा, विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे.
  3. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे. सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे.
  4. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंत:चक्षुंसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात, व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

  1. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो तसेच हे आहे. वॉर्म अप व काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो.
  2. अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन “तासभर तरी मला बोलावू नका” असे सांगून ठेवावे. मोबाईलसारखे अडथळेही दूर ठेवावेत. कारण अशा अडथळ्यांमुळे मनाची एकाग्रता भंगते व ती पुन्हा प्राप्त करायला कष्ट पडतात. मनाची साधलेली प्रवाही अवस्था आपण गमावून बसतो. आणि पुढच्या वेळी ती अवस्था तेवढ्या प्रभावीपणे साधतही नाही.
  3. अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणे अतिशय गरजेचे आहे. मनाला विचलीत न करणारे संगीत एकाग्रता वाढायला मदत करते. अर्थात इच्छा तीव्र असेल तर गोंधळातदेखील एकाग्रता साधता येते. इंद्रियांवरचे असे नियंत्रण अभ्यासाने साधता येते. शक्यतो शांतता मिळविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कारणामुळे अशांतता निर्माण होत असेल तर त्या अशांततेतही एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करीत रहावे. क्षुब्ध होउ नये किंवा निरर्थक वादविवादात वेळही घालवू नये.
  4. अभ्यास करताना अवधान राखणे खूप गरजेचे आहे. मन चंचल असते, उगीच कुठेतरी भटकत राहते किंवा दिवास्वप्नांमध्ये मग्न होते. त्याला आवर घालून पुन्हा अभ्यासाला लावणे म्हणजे अवधान राखणे.

मनाला जागे ठेवण्याचे काही उपाय खाली सांगीतले आहेत :

अ. अतिशय गोड, अतिशय मसालेदार किंवा अतिस्निग्ध पदार्थ आहारात टाळावेत. अशा पदार्थांमुळे ग्लानी येते.

आ. शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. कपडे स्वच्छ, नेटके व सैलसर असावेत. नखे कापलेली असावीत. दुर्गंधी, खाज, आग होणे यामुळे एकाग्रता साधण्यात अडचणी येतात. झोपायचा बिछाना व पांघरुण देखील स्वच्छ असणे आवश्यक आहे, त्यामुळे झोप शांत मिळून मन प्रसन्न राहिल.

इ. अभ्यासाची खोली, अभ्यासाची साधने (वह्या, पुस्तके, लेखनसाधने तसेच आपले हस्ताक्षरही) व्यवस्थित व नीटनेटकी असावीत. पुस्तके फाटली असल्यास ती व्यवस्थित शिवून घ्यावीत. पुस्तकांचा कप्पा, अभ्यासाचे टेबल व्यवस्थित आवरलेले असावे.

ई. घाणेरड्या व अश्‍लील विचारांना प्रयत्नाने मनाबाहेर करावे. मन गलीच्छ विषयांनी व्यापलेले असेल तर एकाग्रता कधीही साध्य होणार नाही. शुध्द, निष्पाप मनामध्येच एकाग्रतेची शक्ती सहज येते. म्हणून पापी व दुष्ट विचारांना दूर ठेवावे.

उ. लहान लहान ध्येये ठरवून ती साध्य करावीत. म्हणजे आत्मविश्वासात भर पडून एकाग्रता वाढत जाईल.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

८. चकाट्या पिटण्याची सवय पूर्णत: सोडावी. ज्या विषयाशी आपल्याला काहीही घेणेदेणे नाही, ज्या विषयाशी संबंधित कोणतीही कृती आपण करणार नाही त्या विषयाबद्दल बडबड करुन आपल्या तोंडाची वाफ दवडू नये. अशा निरर्थक बडबडीमुळे मनाची घडी व शिस्त बिघडते. मन दुबळे व गैरशिस्त हात जाते.

९. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यावर डोके दुखत असेल तर तो शरीराचा दोष आहे हे ओळखून, योग्य व्यायाम, आहार व वैद्यकिय उपचार यांनी तो दूर करावा. च्यवनप्राश, ब्राह्मी सारखी औषधे, दूधासारखा पौष्टिक आहार यांचाही उपयोग होउ शकतो.

१०. मनाच्या एकाग्रतेसाठी सर्वोत्तम पुरक साधन म्हणजे श्रध्दा. श्रध्देच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते. श्रध्देच्या जोरावरच शिवरायांच्या मावळ्यांनी शून्यातून स्वराज्य उभारले. औरंगजेबाची अफाट सामर्थ्यशाली सेना युद्ध हारली ती देखील श्रध्देच्या अभावामुळेच. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्ञानसंपादनाची अफाट शक्ती सुप्तावस्थेत दडून असते. आपल्या अंतस्थ शक्तीबाबत आपण साशंक राहू नये. जीवनात अपयशी ठरणारी माणसे अपयशी ठरतात ती स्वत:ची शक्ती न ओळखल्यामुळे. “काळजीपूर्वक अभ्यास करुन मी माझ्या ज्ञानाचा विकास करुन घेईनच” अशा निर्धाराने अभ्यासाला लागलात तर अशक्य काहीच नाही.

११. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपल्या आवडीच्या ठिकाणी वास करणे मनाला नेहमी आवडते. अर्थात तुम्ही जर तुमच्या अभ्यासविषयांवर प्रेम कराल तर एकाग्रतेने अभ्यास करणे तुम्हाला सहज जमेल. परिचय, सहवासानेच प्रेम वाढते. म्हणून अभ्यासाचे विषय तुम्हाला लगेच आवडू लागतील असे नव्हे. पण अभ्यासाचा विषय जसा कळू लागेल, आकलन वाढू लागेल तशी अभ्यासाची गोडी आपोआप वाढेल. श्रध्दा आणि प्रेम यांद्वारे साधली जाणारी मनाची एकाग्रता ताणर‍हित व संघर्षरहित असते.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

शैक्षणिक पात्रता :

१) किमान उच्च माध्यमिक परीक्षा-१२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
२) उमेदवार माजी सैनिक असल्यास शासकीय निर्णयानुसार शैक्षणिक पात्रतेची अट शिथिल असते.
३) पोलिस बँड पथकासाठी १० वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – सर्वसाधारण गटासाठी १८ ते २८ वर्षे, मागासवर्गीय – १८ ते ३३ वर्षे, माजी सैनिक – सैन्यात भरतीचे वय सैन्यातील एकूण सेवा ३ वर्षे, प्रकल्प व भूकंपग्रस्तासाठी- १८ ते २८ वर्षे, मागासवर्गीय ५ वर्षे शिथिल.

  • शारीरिक चाचणीत ५० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात येते. दररोजचा सराव योग्य वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा. ८० गुणांपेक्षा कमी गुण घेऊ नका.
  • लेखी परीक्षा : १०० गुणाची व ९० मिनिटांची. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. तुम्ही २०१४ पासून पोलीस भरतीची तयारी करत असणार यात शंका नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सरावाला महत्त्व द्या.
  • अंकगणित (२५ गुण) : यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरळव्याज सरासरी, टक्केवारी, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ इ. घटकांचा समावेश असतो.
  • बुद्धीमत्ता चाचणी (२५ गुण) : यामध्ये अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, बेन आकृती, सहसंबंध, दिशा, कूटप्रश्न इ. घटकांचा समावेश.
    मराठी व्याकरण (२५ गुण) : मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, शब्दसिद्धी, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्र्थी, विरुद्धार्थी, शुद्धलेखन यांचा समावेश असतो.
  • सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी (२५ गुण) : यामध्ये महाराष्ट्र, भारत आणि जगाच्या भूगोलाचा तसेच समाजसुधारक, इतिहास, पंचायत राज, राज्यघटना, चालू घडामोडी आणि जिल्हा यावर प्रश्न अपेक्षित असतात.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

शारीरिक चाचणीला सामोरे जाताना…

पोलीस भरतीतील शारीरिक चाचणीदरम्यान झालेल्या दुर्घटनांमुळे हा विषय सध्या ऐरणीवर आलाय. अशा चाचण्यांना सामोरे जाताना नियोजन हवे. त्यासाठी उमेदवाराने कशा प्रकारे तयारी करायला हवी, याविषयी माहिती जाणून घेऊया. पोलीस सेवा, सैन्यदले आणि वन विभागातील उच्च अधिकाऱ्यांच्या भरती योजनेत काहीवेळा शारीरिक चाचणीचा समावेश नसतो. वैद्यकीय तपासणी, शारीरिक मोजमापे आदींसंबंधींच्या काही अटी असतात; मात्र प्रशिक्षणात शारीरिक प्रशिक्षणाचा अंतर्भाव केलेला असतो. शासकीय सेवेतील काही भरती योजनांमध्ये बुद्धिमत्ता चाचणीच्या बरोबरीने शारीरिक चाचणीदेखील महत्त्वाची असते. पोलीस भरती, अग्निशमन दलातील भरती, पोलीस उपनिरीक्षक, वनखात्यातील भरती, सैन्य दलातील सैनिक भरती या साऱ्यांमध्ये शारीरिक चाचणी अतिशय महत्त्वाची ठरते. रेल्वेच्या ग्रुप ‘डी’मध्ये देखील लेखी परीक्षेच्या आधी शारीरिक चाचणी घेतली जाते. शासकीय सेवेचे आकर्षण भरपूर असल्याने जागा कमी असल्या तरी त्यासाठी प्रवेश अर्जाचा महापूर येतो. त्यातच परीक्षा स्वरूपाची माहिती नीट न घेतल्याने अनेक वेळा शारीरिक चाचणीत विद्यार्थ्यांची दमछाक होताना दिसते. प्रसंगी काही वेळा दुर्दैवी मृत्यूदेखील झालेला आढळतो. शारीरिक चाचणीची पूर्वतयारी व्यवस्थित केल्यास अशा दुर्दैवी घटकांचे प्रमाण कमी करता येईल.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

शारीरिक चाचणीचे स्वरूप :

चाचणीचे स्वरूप हे त्या-त्या सेवेतील कामावर अवलंबून असते. वनखात्यामधील वनरक्षक पदासाठी पुरुषांना २५ कि.मी. तर महिलांना १४ कि.मी. धावण्याची परीक्षा असते. जंगलरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्यासाठी इतका फिटनेस असणे आवश्यक आहे, अशीच यामागील धारणा असावी; मात्र या शारीरिक क्षमतेची पूर्वतयारी न करता धावल्याने अपघात घडतात. धावण्याच्या या प्रकारात उमेदवाराने दोन ते तीन महिने आधीपासून तयारीला लागणे आवश्यक आहे. साधारणत: उमेदवार धावण्याची प्रॅक्टिस सकाळी लवकर उठून करताना आढळतात; परंतु शारीरिक चाचणीचा काळ हा भर उन्हाचा असण्याची शक्यता जास्त असते. चाचणीसाठी अनेकदा सकाळी ९.३०/ १० वाजता बोलावले जाते; पण प्रत्यक्ष आपला क्रमांक येईपर्यंत कदाचित आणखी दोन-तीन तास जाऊ शकतात. घरून सकाळी नाश्ता करून निघालेले असले तरी आपली चाचणीची वेळ येईपर्यंत भूक तीव्र लागलेली असते. चाचणीच्या परिसरात खाण्याची चांगली व्यवस्था बहुतेक वेळा नसते. अर्थातच उपाशीपोटी धावल्याने देखील चक्कर येणे, बेशुद्ध होणे असे प्रकार होताना दिसतात.

शारीरिक चाचणी- कशी कराल तयारी?

हजारोंच्या संस्थेने विद्यार्थी आल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील कोलमडण्याची शक्यता असते, तसेच या ठिकाणी पाणी विकत घेण्याची सोयदेखील अपुरी पडू शकते. यामुळे शारीरिक चाचणीची तयारी उमेदवारांनी विपरीत परिस्थिती लक्षात घेऊन करावी. शारीरिक चाचणीचे ठिकाण जिल्हा केंद्रात असते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना दोन-तीन तासांचा प्रवास करून येथे पोहोचावे लागते. वर उल्लेख केलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शारीरिक चाचणीचे प्लॅनिंग करावे. परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेकडून अपेक्षा बाळगाव्यात; पण त्या पूर्ण होतील अशी आशा मनात धरू नये.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

आहार :

व्यायाम सुरू केल्यावर पुरेसा आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. शाकाहारी असल्यास दूध, डाळी, फळभाजी (पडवळ, भोपळा, सुरण वगैरे) शेंगभाजी (गवार, फरसबी वगैरे) यांचे योग्य प्रमाणात सेवन करावे.

दिवसातून एकदा पालेभाजी खावी. मांसाहारामध्ये अंडी, मासे यांचा समावेश आहारात करावा. न्याहारीच्या वेळी मोड आलेले कडधान्य खावे. तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळावे. त्या-त्या ॠतूमधील फळे खावीत. सरावाच्या दरम्यान थकवा जाणवत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

शारीरिक चाचणीचे नियोजन :

भरतीच्या जाहिरातीच्या काळापासून शारीरिक चाचणीची तयारी सुरू करावी. शारीरिक चाचणीमधील तपशीलाची (धावणे, लांब उडी, गोळाफेक वगैरे) योग्य माहिती घ्यावी.

शारीरिक चाचणीचा सराव करताना सुरुवात आस्ते कदम करून शेवटच्या दिवसात वेग वाढवावा. (शरीरालासुद्धा बदल अंगवळणी पडणे आवश्यक आहे.) धावण्याच्या स्पर्धेतील दम वाढण्याच्या दृष्टीने चढावावर धावण्याचा सराव करावा. शहरांमध्ये जिने चढण्याचा व्यायामदेखील उत्तम ठरेल. सुरुवातीच्या दिवसात सकाळी सराव केल्यानंतर दुपारच्या वेळात सराव करावा. (साधारणत: शारीरिक चाचण्या दुपारच्या वेळात होतात.) सरावाच्या वेळी, तसेच चाचणीच्या वेळी योग्य पेहराव (हाफपॅण्ट, टीशर्ट वगैरे) करावा. योग्य शूज पायात वापरावेत.

चाचणीच्या वेळी पिण्याचे पुरेसे पाणी, ग्लुकोन-डी वगैरे घरूनच घेऊन यावे. चाचणीच्या ठिकाणी हजर राहण्याची वेळ आणि प्रत्यक्षात आपल्या चाचणीची वेळ यामध्ये बराच वेळ जाऊ शकतो. यासाठी खाण्याचे योग्य पदार्थ बरोबर बाळगावेत. शक्य असल्यास फ्रूट ज्यूस बरोबर ठेवावा. केळी हे तात्काळ ऊर्जा देणारे फळ आहे. तेसुद्धा खाण्यास हरकत नाही.

उन्हाचा ताप कमी होण्यासाठी टोपीचा वापर करावा. चाचणीच्या आदल्या दिवशी पुरेशी विश्रांती घ्यावी. चाचणीच्या अगोदर हलका वॉर्मअप करावा. सरावाच्या वेळी रस्त्यावरूनही (वनरक्षकासाठी अत्यावश्यक) धावावे.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी रोज साधारणत: ३५ ते ४० मिनिटे जलद चालणे/ धावणे हा व्यायाम करावा. बरोबरीने ११ सूर्यनमस्कार, २५ दंड (पूल अरस), ५० बैठका इतका व्यायाम पुरेसा आहे. गोळाफेकीसाठी स्पर्धेच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या वजनाच्या गोळ्यानेच सराव करावा. १०० मी., २०० मी., ४०० मी. वगैरे अंतराच्या धावण्याच्या चाचणीचा सराव घड्याळ लावून करावा.

धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक आदींच्या सरावासाठी शाळेतील वा महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे.

पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन

क्रंपरीक्षेचे नावटेस्ट लिंक
1मेगाभरती परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
पोलीस भरती परीक्षा जाहिरात डाउनलोड कराडाउनलोड करा
2आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोडडाउनलोड करा
3पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सोडवा
4पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5पोलीस भरती पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रतामाहिती पहा
6महाराष्ट्र (SRPF) पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रता २०२०माहिती पहा
7पोलीस भरती भरती परीक्षा पुस्तक यादीडाउनलोड करा
8पोलीस भरती भरती परीक्षा अभ्यास नियोजनडाउनलोड करा
9पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिजविडियो पहा
10पोलीस भरती भरती परीक्षाडाउनलोड करा
11पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिजटेस्ट सिरिज सोडवा
12पोलीस भरती भरती परीक्षा

    पोलीस भरती परीक्षा अभ्यास नियोजन, नियोजनपूर्वक अभ्यास, अभ्यास कसा करावा, पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे, पोलीस भरतीसाठी उंची किती लागते, महाराष्ट्र पोलीस भरती शैक्षणिक पात्रता, गोळा फेक मैदान मापे पोलीस भरती, पोलीस भरती पुस्तक, पोलीस भरती मेडिकल, पोलीस भरती कागदपत्रे, पोलीस भरती अभ्यासक्रम, महाराष्ट्र पोलीस भरती पात्रता, पोलीस भरती प्रश्नपत्रिका, पोलीस शिपाई वेतन, महाराष्ट्र पोलीस रचना, police bharati study Planning, police bharati study routine

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *