Learn For Dreams
शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार उघड पोलिसांकडून छापे
टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून गैरव्यवहाराची सखोल चौकशी केली जाणार आहे.
-वर्षा गायकवाड शालेय शिक्षण मंत्री
पुणे पोलिसांच्या सायबर सेलने कौशल्याने तपास करून गेल्या पंधरा दिवसांत राज्यातील महत्त्वाच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत. आत्तापर्यंत या तिन्ही परीक्षांमधील गैरव्यवहार प्रकरणी बावीस आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
तुकाराम नामदेव सुपे यांच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्या घरात 88 लाख 49000 रुपयांची रोकड, पाच ग्रॅम चे सोन्याचे नाणे, पाच तोळे दागिने, साडेपाच लाख रुपयांच्या मुदत ठेवीचे कागदपत्रे आढळली. सुपे यांनी मित्रांना लाखो रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे . एजंट संतोष हरकळ यांच्या बुलढाणा येथील घर झडती मध्ये 2019-2020 मधील निकालात फेरफार केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.