MSTE Exam Syllabus -2024
1. परीक्षा पात्रता :
वर्ग 4 ते 10 मधील सर्व शाळेतील विद्यार्थी अनुदानित/विनाअनुदानित/इंग्रजी शाळा/कान्वेंट/आश्रमशाळा व इतर सर्व शाळेतील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात.
2. आरक्षण : खुली स्कॉलरशिप परीक्षा असेल. कोणतेही आरक्षण नसेल.
3. परीक्षा पद्धत :
ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल.
टप्पा 1 : ऑनलाइन स्वरूपात असेल (7 जाने 2024)
टप्पा 2 : ऑफलाइन/ऑनलाइन असेल (28 जाने 2024)
एक विद्यार्थी एकच पेपर सोडवू शकेल. स्कॉलरशिप साठी विद्यार्थी शाळेचे ओळखपत्र अनिवार्य असेल त्यावर मुख्याध्यापक/प्राचार्य यांची सही व शिक्का आवश्यक असेल. ओळखपत्र फॉरमॅट सोबत दिला आहे. तो डाउनलोड करून घ्यावा व प्रिंट काढून अपलोड करावा.
4. परीक्षा फी : मोफत
5. वयोमर्यादा : 9 वर्षे ते 18 वर्षच्या आतील (वय मोजणे 1 जाने 2024 या तारखेस)
6. निवड पद्धत :
टप्पा 1 : ऑनलाइन स्वरूपात असेल (7 जाने 2024) रविवार वेळ सकाळी 10 ते 11.30 टप्पा 1 मध्ये प्रत्येक वर्गातील 150 विद्यार्थी टप्पा 2 साठी पात्र असतील असे एकूण वर्ग 5,6,7,8,9,10 मधील एकूण 800 विद्यार्थी टप्पा 2 मध्ये पात्र होतील.. (उदा. 5 व्या वर्गातील 150 विद्यार्थी टप्पा 2 साठी पात्र)
टप्पा 2 : ऑफलाइन/ऑनलाइन असेल (28 जाने 2024) रविवार वेळ सकाळी 10 ते 11.30 परीक्षा वेळापत्रक वेबसाइटवर किंवा Whatspapp/Message च्या माध्यमातून कळविले जाईल.
यामधून स्कॉलरशिप साठी प्रत्येक वर्गातील पहिले 25 विद्यार्थी पात्र असतील. (एकूण 6 वर्गातील 150 विद्यार्थी)
1. Gold स्कॉलरशिप – 1 विद्यार्थी प्रती महिना 3000 रु एकूण 24 महीने (दोन वर्ष) असे 72000 मिळतील.
2. Silver स्कॉलरशिप – 3 विद्यार्थी प्रती महिना 1000 रु एकूण 24 महीने (दोन वर्ष) असे 24000 मिळतील.
3. Bronze स्कॉलरशिप – 21 विद्यार्थी प्रती महिना 500 रु एकूण 24 महीने (दोन वर्ष) असे 12000 मिळतील.
7. स्कॉलरशिप वाटप :
प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेला विद्यार्थ्याच्या खात्यावर रक्कम जमा केली जाईल. त्यासाठी निवड झालेल्या विदयार्थयाचे राष्ट्रीयकृत बँकेत/पोस्टात खाते असणे आवश्यक आहे.
8. सूचना :
8.1 स्पर्धात्मक परीक्षा बदल करणे रद्द करणे स्थगित करणे व अंशतः बदल करणे स्कॉलरशिपच्या बक्षीसामध्ये बदल करण्याचा अधिकार हा अकॅडमीकडे राखून ठेवण्यात येत आहे.
8.2 परीक्षा व परीक्षेचे संबंधित प्रश्न संख्या यामध्ये काही आक्षेप असल्यास त्याबद्दल ऑब्जेक्शन निवारण झाल्यानंतर अंतिम उत्तर तालिका प्रसारित केल्या जाणार आहे.
8.3 स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काही बदल झाल्यास याबाबतची माहिती व बदल वेळोवेळी अकॅडमीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार स्कॉलरशिप भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यात येईल.
8.4 स्कॉलरशिप परीक्षेचा जो लाभ आहे तो वरील दिलेल्या नियमानुसारच या ठिकाण देण्यात येईल त्यामध्ये तसेच परीक्षा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार, गैरमार्ग, गैरवर्तन, आढळल्यास त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
8.5 अर्ज करताना दिलेली संपूर्ण माहिती खरी असल्याबाबत त्या ठिकाणी नमूद करणे आवश्यक राहील माहिती खोटी आढळल्यास परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यावर विद्यार्थीची निकाल रद्द/बाद करण्यात येईल.
8.6 अकॅडमी ने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, निर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादी सर्व परीक्षार्थी वर बंधनकारक असतील.
ठिकाण : पुणे
दिनांक : 19 नोव्हेंबर 2023