Learn For Dreams
Law students are also in trouble now due to TET : टीईटीमुळे आता कायद्याचे विद्यार्थीही अडचणीत….
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं आयोजन 10 ऑक्टोबरला करण्यात येणार होतं. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्यानं राज्य सरकारच्या परवानगीनं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टीईटी परीक्षा 31 ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं यासंदर्भात सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे.
10 ऑक्टोबरला घेण्यात येणारी टीईटी परीक्षा लांबणीवर टाकली गेली आहे. आता 31 ऑक्टोबरला परीक्षा होणार असल्यानं प्रवेशपत्र देखील आता उशिरानं मिळणार आहेत. 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान प्रवेशपत्र मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात
प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी
प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.
टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
टीईटी परीक्षेचं वेळापत्रक
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 31/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 31/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30
पात्रता
टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
पेपर 1 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी, मराठी आणि इंग्रजी भाषा , गणित यावर टीईटी परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न विचारले जातात.
पेपर क्रमांक 2 मध्ये कोणत्या अभ्यासक्रमावर प्रश्न
बालविकास आणि पेडॉगॉजी. इंग्रजी आणि मराठी भाषा, गणित आणि सामाजिक शास्त्रे या विषयांवर आधारीत प्रश्न पेपर क्रमांक दोन मध्ये विचारले जातात.
टीईटी परीक्षेमध्ये 60 टक्केंहून अधिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण उत्तीर्ण केले जातं. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची मर्यादा 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे.