Learn For Dreams
द्रव पदार्थ शुद्धीकरणाच्या पद्धती :-Methods of Liquid Purification
निवळणे :- एखाद्या द्रवातून त्यात मिसळलेले जड व अविद्राव्य पदार्थ वेगळे करून स्वच्छ द्रव मिळविण्याच्या पद्धतीला निवळणे असे म्हणतात.
उदा. गढूळ पाण्यात मातीचे कण मिसळले असता ते काही वेळानंतर तळाशी बसतात आणि शुद्ध पाणी वेगळे होते. काही वेळा पानी शुद्ध करण्याकरिता गढूळ पाण्यात तुरटीचा खडा फिरवितात. त्यामुळे पाण्यातील मातीचे कण जड होतात आणि ते पाण्याच्या पात्राच्या तळाशी जमतात.
शुद्धीकरणाची ही पद्धत फक्त जड आणि अविद्राव्य कण वेगळे करण्याकरिताच उपयोगात आणता येते.
🌷 गाळणे :- ज्या पद्धतीने द्रवातील जड व हलके अविद्राव्य कण द्रवातून वेगळे केले जातात, त्या पद्धतीला गाळणे असे म्हणतात.
· उदा. निवळले पानी चाळणी किंवा गाळण कागदामधून गाळल्यास पाण्यातील अविद्राव्य कण गाळण कागदात शिल्लक राहतात आणि द्रव्य भांड्यात जमा होतो.
🌷 उर्ध्वपातन :- द्रवाला उष्णता दिली असता त्याचे वाफेत रूपांतर होते व वाफा थंड केल्या असता मूळ स्वरुपातील शुद्ध द्रव प्राप्त होता या प्रक्रियेला उर्ध्वपातन प्रक्रिया असे म्हणतात.
· उदा. मीठ आणि पाण्याचे संतृप्त द्रावण तयार करून ते तापविल्यास त्या द्रावण्यातील पाण्याची मीठ शिल्लक राहते.
🌷भागश: उर्ध्वपातन :- या पद्धतीमध्ये परस्परामध्ये मिसळणारे आणि भिन्न उत्कलन बिंदु असणारे दोन किंवा अधिक द्रव, उर्ध्वपातन पद्धतीने वेगळे करता येते. त्या पद्धतीला भागश: उर्ध्वपातन असे म्हणतात.
· उदा. कच्चा खनिज तेलापसून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, व डांबर इत्यादि पदार्थ वेगळे करण्याकरिता या पद्धतीचा उपयोग केला जातो.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now