ग.दि. माडगूळकर मराठी साहित्यिक

ग.दि. माडगूळकर मराठी साहित्यिक

🌷🌷ग.दि. माडगूळकर मराठी साहित्यिक जीवन परिचय : 🌷🌷

ग.दि. माडगूळकर मराठी साहित्यिक (जन्म : शेटफळे-सांगली जिल्हा, १ ऑक्टोबर १९१९; मृत्यू : पुणे, ४ डिसेंबर १९७७). हे विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक होते.त्यांचे शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची पतेउत्तीर्ण होऊ शकले नाहीत. 

पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात आले त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती. तिचा येथे उपयोग झाला. 

‘हंस पिक्चर्स’ ह्या चित्रसंस्थेच्या, मा. विनायक दिग्दर्शित ब्रह्मचारी (१९३८) ह्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका करून माडगूळकरांनी आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकीर्दीचा आरंभ केला

. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. त्या निमित्ताने खांडेकरांच्या संग्रहातली पुस्तके त्यांना वाचावयास मिळाली; खूप लिहावेसे वाटू लागले; त्यांच्या कवितालेखनालाही वेग आला

नवयुग चित्रपट ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले.

🌷कविता–🌷

जोगिया (१९५६), 

चार संगीतिका (१९५६), 

काव्यकथा (१९६२),

 *गीत रामायण (१९५७), 

गीत गोपाल (१९६७),

 गीत सौभद्र (१९६८). 

कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२),

 तुपाचा नंदादीप (१९६६), 

चंदनी उदबत्ती (१९६७). 

कादंबरी–आकाशाची फळे (१९६०).

 आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२), ‘अजून गदिमा’ आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).

🌻🌻पुस्तके🌻🌻

ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-

कविश्रेष्ठ गदिमा (डॉ. श्रीकांत नरुले)

गीतयात्री गदिमा : लेखक – मधू पोतदार

गदिमा साहित्य आणि लोकतत्त्व (डॉ. वासंती राक्षे)

ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.माडगूळकर हे गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *