बल शक्ती

बल शक्ती Force of Force

बल शक्ती नोट्स

निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.

गुरुत्व बल

विधुत चुंबकीय बल

केंद्रकीय बल

क्षीण बल

गुरुत्वबल (Gravitational Force)=>

सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या  वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ असे म्हणतात.

हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.

एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.

गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.

न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.

F=G m1 m2 /r2  G = विश्वगुरुत्व स्थिरांक

SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2

CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2

पृथ्वीचे गुरुत्व त्वरण=>

एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच ‘गुरुत्व त्वरण’ असे म्हणतात.

____________________________________

शक्ती 

कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे ‘शक्ती’ होय.

कार्य करण्याच्या दरास ‘शक्ती’ म्हणतात.

केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.

गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.

शक्ती (P) = कार्य/काल = w/t

शक्तीचे एकक=>

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

1 वॅट = 1 ज्युल/सेकंद

1 किलोवॅट = 1000 वॅट

औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.

1 अश्वशक्ती = 746 वॅट

व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.

1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.

1 Kwhr = 1 Kw × 1 hr

= 1000w × 3600 s

= 3.6 × 106 Joules

घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

    इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

      इतर महत्वाच्या लिंक्स

      सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

      Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

      नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

      Leave a Reply

      Your email address will not be published. Required fields are marked *